शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क विभागाकडून आठ लाखांचे मद्य जप्त, दीड लाखाची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 02:42 IST

विधानसभा निवडणूकीची आचार संहीता जाहीर झाल्यापासून रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ६१ ठिकाणी गुन्हे दाखल करून आठ लाख २० हजार ३०६ रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अलिबाग : विधानसभा निवडणूकीची आचार संहीता जाहीर झाल्यापासून रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ६१ ठिकाणी गुन्हे दाखल करून आठ लाख २० हजार ३०६ रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एक लाख ४२ हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. याशिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ हजार ३२३ पोस्टर, होर्डिंग, बॅनर्स, फ्लेक्स काढून टाकण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.पनवेल, कर्जत या विधानसभा मतदार संघासाठी विनोद कुमार यांची नियुक्ती झाली. पनवेलमध्ये ११ आॅक्टोबरला पहिली खर्च ताळमेळ बैठक, १४ आॅक्टोबरला दुसरी आणि १८ आॅक्टोबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक घेणार आहेत. तर कर्जतमध्ये १० आॅक्टोबरला पहिली , १३ आॅक्टोबरला दुसरी तर १७ आॅक्टोबरला तिसरी बैठक होणार आहे. उरण, पेण या विधानसभा मतदार संघासाठी के. सुनिल कुमार नायर यांची नियुक्ती झाली आहे. ते उरणमध्ये १० आॅक्टोबरला पहिली खर्च ताळमेळ बैठक, १४ आॅक्टोबरला दुसरी तर १८ आॅक्टोबरला तिसरी बैठक घेणार आहेत. पेणमध्ये ११ आॅक्टोबरला पहिली खर्च ताळमेळ बैठक, १५ आॅक्टोबरला दुसरी आणि १९ आॅक्टोबरला तिसरी खर्च ताळमेळ बैठक घेणार आहेत.अलिबाग, श्रीवर्धन, महाड या मतदार संघासाठी श्रीबास नाथ यांची नियुक्ती झाली आहे. अलिबाग मध्ये १० आॅक्टोबरला पहिली खर्च ताळमेळ बैठक, १४ आॅक्टोबरला दुसरी आणि १८ आॅक्टोबरला तिसरी बैठक घेणार आहेत. श्रीवर्धनमध्ये ९ आॅक्टोबरला पहिली खर्च ताळमेळ बैठक, १२ आॅक्टोबरला दुसरी आणि १६ आॅक्टोबरला तिसरी बैठक आहे.प्रशिक्षणास गैरहजर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणारविधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला गैरहजर असणा-या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार व निवडणूक संचालनासंबंधी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी दिली.रायगड जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात एकूण २,७१४ मतदान केंद्रावर २१ आॅक्टोबर, २०१९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी एकूण १३ हजार ६०० कर्मचाºयांना मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, अन्य मतदान अधिकारी या प्रमाणे जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे, सर्व कर्मचारी यांना आदेश बजावण्यात आले आहेत.सर्व मतदान कर्मचाºयांचे निवडणूक कामकाज विषयक प्रथम प्रशिक्षण विधानसभा मतदारसंघ निहाय २८ सप्टेंबर, २०१९ रोजी आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी सर्व नियुक्त मतदान कर्मचारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते, परंतु एकूण १,२७७ मतदान कर्मचारी प्रथम प्रशिक्षणास गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. या १,२७७ कर्मचाºयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.१ आॅक्टोबर, २०१९ रोजी विधानसभा मतदार संघातील निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. उपस्थित न होणाºया कर्मचाºया विरु द्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.समाज माध्यमांवरही बंधनेविधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची (जनरल) नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल, कर्जतसाठी रेणू जयपाल उरण, पेणसाठी सुसंता मोहपात्रा, अलिबाग, श्रीवर्धन, महाडसाठी एस. हरीकिशोरे यांची नियुक्ती केली असल्याची माहितीही डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.समाज माध्यमांवरून होणारा प्रचार, जाहिराती तसेच आक्षेपार्ह मजकूर यांची निवडणूक यंत्रणेमार्फत पडताळणी केली जाणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. याप्रसंगी निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी वैशाली माने, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके उपस्थित होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड