नेरळ : बेकरे गावालगतच्या जुमापट्टी डोंगरमाथ्याजवळ धाड टाकून नेरळ पोलिसांनी तीन दारूच्या भट्ट्या व झाडीझुडपांत लपून ठेवलेला गूळ व नवसागर, असा सुमारे एक लाख २० हजारांचा साठा उद्ध्वस्त केला. यासंदर्भात पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून, नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना दारूसाठ्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. बेकरे गावच्या जंगलात जाऊन तेथे बेवारस स्थितीत सुरू असलेल्या तीन गावठी दारूच्या भट्ट्या तसेच नाल्याच्या बाजूला लपून ठेवलेला गूळ व नवसागरमिश्रित रसायने भरलेले ३६ प्लॅस्टिक व पत्र्याचे २०० लिटर क्षमतेचे ड्रम त्यातील सुमारे ५४०० लिटर रसायन एकूण सुमारे एक लाख २० हजार किमतीचा साठा आढळला. पोलिसांनी हा साठा तिथेच उद्ध्वस्त केला.
गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 04:03 IST