शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

भरावामुळे खाडीकिनारे धोक्यात; जेटी बांधकामामुळे नदीपात्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 04:15 IST

खाडीपात्र अरुंद होऊन भविष्यात केरळ सारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिकंदर अनवारे दागसाव : महाड तालुक्यातील सावित्री खाडीपट्टा विभागात गेली अनेक वषे पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून रेती उत्खनन सुरू आहे, त्यामुळे खाडीपात्राला धोका निर्माण झाला आहे. किनाऱ्यालगतची वनसंपदा नष्ट होत आहे. याशिवाय सावित्री खाडीच्या किनाºयांवर अनधिकृत जेटी आणि भराव केला जात आहे. यामुळे खाडीपात्र अरुंद होऊन भविष्यात केरळ सारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सावित्री खाडीमध्ये महाड औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी आल्यानंतर बहुतांश शेतकºयांनी शेती सोडून दिली. पारंपरिक पद्धतीने हातपाटीद्वारे वाळू उत्खननातून पैसे मिळू लागल्याने अनेकांच्या नजरा सावित्री खाडीकडे वळल्या. कालांतराने यंत्राद्वारे वाळू उत्खनन होऊ लागले. या यंत्राने पर्यावरणाचा धोका असताना वाळू उत्खनन सुरूच आहे. स्थानिकांनी आपल्या जागा रेतीउपशाकरिता आणि साठ्याकरिता दिल्या आहेत. वाळूतून मिळणाºया पैशांच्या हव्यासापोटी पर्यावरणाचा सर्रास ºहास केला जात आहे. काही ठिकाणी खारफुटीची कत्तल करून, प्लॉट तयार करण्यात आले आहेत. याबाबत अनेक तक्र ारी होऊन संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. शिवाय, याच प्लॉटवर रेतीसाठा आणि उपशाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानग्या दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे.महाड तालुक्यातील सव, रावढळ, तुडील, जुई, म्हाप्रळ, कुंबळे, वराठी, या गावांबरोबरच दासगाव, टोळ, सापे, दाभोळ, कोकरे ही गावे खाडीलगत आहेत. दासगाव, वराठी, सापे, टोळ, कोकरे, दाभोळ, ओवळे या गावांच्या परिसरात रेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असून, यांत्रिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू आहे. उत्खनन होणारी वाळूसाठ्याकरिता आणि होड्या लावण्याकरिता प्लॉटधारकांनी थेट नदीतच बांधकामे केली आहेत. नदीपात्रात भराव करून पक्के बांधकाम करून जेटीची कामे केली जात आहेत.जिल्हा प्रशासनाने देण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये मौजे कोकरे तर्फे गोवेले, मोजे दाभोळ, मौजे सापे तर्फे गोवेले, मौजे ओवळे, या भागातील प्लॉट हे सी.आर.झेड. प्रमाणे संरक्षित आहेत. यातील काही गावांतील प्लॉट हे कांदळवनामध्ये येतात. न्यायालयाच्या आदेशानुसार, शासनाने कांदळवन क्षेत्रातील बांधकामांवर पूर्णत: बंदी घालणे आदी नियमावली देण्यात आली आहे, असे असतानाही मौजे कोकरे तर्फे गोवेले, मौजे दाभोळ, मौजे सापे तर्फे गोवेले, मौजे ओवळे, या गावांतून या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनच कांदळवन क्षेत्रात रेतीसाठ्यास परवानगीमहाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात ज्या ठिकाणी रेतीसाठ्यास परवानगी देण्यात आली आहे, ते प्लॉट कांदळवन क्षेत्रात येतात, तशा प्रकारचा उल्लेख नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाने जमीन वापर दाखल्यावर केला आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाने याच प्लॉटवर रेतीसाठ्यास परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्लॉटवर वाळूच्या माध्यमातून निघणारा रेजग्याचा भराव करण्यात आला आहे. सावित्री खाडीत हा भराव करून जेटीचे पक्के बांधकाम देखील करण्यात आले आहे. सावित्रीच्या दोन्ही बाजूने हा प्रकार सुरू असल्याने खाडीचे अतोनात नुकसान होत आहे. यापूर्वी रासायनिक पाण्याने खाडीचे नुकसान झाले आणि आता वाळूउपशाकरिता कृत्रिम उपाय पर्यावरणास आणि खाडीकरिता धोकादायक बनले आहेत.केरळसारखी पूरस्थिती निर्माण होण्याचा धोकाकेरळमध्ये आलेल्या पुराने संपूर्ण देश हादरून गेला. या निसर्गाच्या प्रकोपाला मानवच जबाबदार असून, नदी-खाडीकिनारी होणारे बेसुमार उत्खनन कारणीभूत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात. अशीच परिस्थिती महाडमध्ये उद्भवण्याची शक्यता या वेळी व्यक्त करण्यात येत आहे.खाडीमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामांची आणि कांदळवन नुकसानाची पाहणी केली जाईल, त्यानुसार कारवाईही केली जाईल.-विठ्ठल इनामदार,प्रांताधिकारी, महाड

टॅग्स :riverनदी