शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

अतिवृष्टीमुळे म्हसळेत दोन लाख ७२ हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 4:17 AM

काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काम बंद केले आहे. तालुक्यात आतापर्यंत ११७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

म्हसळा : म्हसळा तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आह. याचा फटका नागरिकांना व शेतकऱ्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीतील कामे संथ गतीने होत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काम बंद केले आहे. तालुक्यात आतापर्यंत ११७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने घरांत पाणी घुसले आहे. नवे नगर, दिघी मार्ग परिसरांत गटारे, नाले तुंबून नागरी वस्तीत पाणी घुसत होते. या कालावधीत घरांचे छप्पर, वासे, कौले व कोने पडणे, पत्र्यांचे नुकसान होणे या नैसर्गिक आपत्तीन तालुक्यात एकूण २ लाख ७१ हजार ९०० रुपयांची नुकसान नोंद झाली आहे.तालुक्यातील पाभरे, कांदळवाडा, घुम, केलटे येथे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले आहे. वादळी वाºयात विजेचा खांब पडून खरसई येथे गाय,काळसुरी येथे बैल, म्हसळा येथे म्हैस मृत होऊन शेतकºयांचे १ लाख २७ हजारांचे नुकसान झाले आहे. तर घोणसे येथे फरशी, कुंबळे येथे स्लॅबचे बांधकाम कोसळून सुमारे ३ लाख ४ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नायब तहसीलदार के.टी.भिंगारे यांंनी दिली.पुणे- दिघी राष्ट्रीय महामार्गावर एमएमआरडीचे अधिकाºयांचे दुर्लक्ष व ठेकेदाराचे निकृष्ट कामामुळे शेतकºयांना आपल्या शेतात जाण्यासाठी सुलभ रस्ता नसल्याने अडचणी होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याबाबत अद्याप उपाययोजना झालेल्या नाहीत.बीएसएनएल ठप्पतालुक्यात बीएसएनएलची सेवा ठप्प झाली होती. नेटवर्क सेवाही बंद झाल्याने अनेक ठिकाणी शासकीय कार्यालये, बँकामध्ये व्यवहार बंद होते. तालुक्यात अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तालुका तहसीलदार शरद गोसावी यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिले आहेत..विजेचा लपंडाव सुरूच!एकीकडे जोरदार पाऊस पडत असतानाच म्हसळा शहरासह तालुक्यात विजेचा लपंडाव अधूनमधून सुरूच होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.काही गावांतून तब्बल ३ ते ४ दिवस वीजपुरवठा नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Rainपाऊस