शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कोरोनामुळे बँकिंग व्यवसायामध्ये ठेव संकलन, कर्जवाटपावर परिणाम - प्रदीप नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 00:31 IST

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांच्या वाढिदवसाचे औचित्य साधून बँकेमध्ये मंगळवारी ट्रेझरी विभागाचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या हस्ते झाले.

अलिबाग : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आर्थिक व्यवस्थेची घडी पूर्णपणे बिघडत असताना बँकिंग व्यवसायामध्ये ठेव संकलन, कर्जवाटप आणि कर्जवसुली यावर त्याचे दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. यामुळे बँकेने पारंपारिक व्यवसायाच्या पलीकडे जाऊन बँकिंग व्यवसायामध्ये विविधता आणणे ही काळाची गरज आहे. तसेच आधुनिक व्यवसायाकडे देखील सकारात्मक नजरेने पाहणे आणि त्या दृष्टीकोनातून तयारी करणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी केले.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांच्या वाढिदवसाचे औचित्य साधून बँकेमध्ये मंगळवारी ट्रेझरी विभागाचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रदीप नाईक बोलत होते. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकित्रत व्यवसाय हा ३५०० कोटींपेक्षा अधिक असून बँक आजमितीला १५०० कोटी रु पयांची गुंतवणूक करते, या गुंतवणुकीच्या नफ्यातून बँक सहकारामधील इतर संस्था तसेच बँकेच्या ठेवीदारांना आकर्षक व्याजदर देऊ शकते, त्यामुळे ट्रेझरी विभागाची व्यापकता मोठ्या प्रमाणावर असून रायगड जिल्हा सहकारी बँकेसमवेत त्याचा फायदा सहकार क्षेत्रातील संस्थाना होणार आहे असेही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी आवर्जून सांगितले. ट्रेझरी विभागामुळे व्यवहारामध्ये अधिक नफा क्षमता तसेच पारदर्शकता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर वाघमोडे, बँकेचे उपसरव्यवस्थापक मंदार वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.‘संकल्पना सादर करावी’बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि नेतृत्वामुळे संचालक मंडळ यांना एकत्रित निर्णय घेताना आत्मविश्वास अधिक मिळतो, असे मत व्यक्त केले, तसेच बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने अधिक गतिमान, तसेच आधुनिक पर्याय निर्माण करण्यासाठी अभिनव संकल्पना संचालक मंडळास सादर कराव्यात, यासाठी आवाहनही केले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbankबँक