शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दरोड्यांचे सत्र सुरूच

By admin | Updated: September 2, 2015 03:43 IST

रायगड जिल्ह्यात दरोडे आणि घरफोड्यांचे सत्र सुरूच असून अलिबाग, पालीमध्ये पडलेल्या दरोड्यानंतर हे लोण आता दक्षिण रायगडमध्ये पुढे सरकल्याचे दिसून येत आहे

महाड/पोलादपूर : रायगड जिल्ह्यात दरोडे आणि घरफोड्यांचे सत्र सुरूच असून अलिबाग, पालीमध्ये पडलेल्या दरोड्यानंतर हे लोण आता दक्षिण रायगडमध्ये पुढे सरकल्याचे दिसून येत आहे. सोमवारी मध्यरात्री माणगाव शहरात भरवस्तीत शुभम ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या सराफ पेढीवर पडलेल्या दरोड्यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला. तर पोलादपूर शहरात पोस्ट कार्यालयावर दरोडा टाकून पावणेदोन लाख रुपयांची रोकड लुटून दरोडेखोरांनी रात्री पलायन केल्याची घटना घडली. यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे.माणगांव येथील मोर्बा मार्गावर शुभम ज्वेलर्स या पेढीचे लोखंडी शटर्स तोडून चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. पेढीचे मालक संदीप बोत्रे यांनी माणगांव पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.सोमवारी मध्यरात्री पोलादपूर येथील शिवाजीनगर परिसरात पोस्ट कार्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी उचकटून चोरट्यांनी लोखंडी कपाटात ठेवलेल्या कापडी पिशव्यामधील १ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून पलायन केले. प्रभारी पोस्ट मास्तर एम. जी. सलागरे यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. पोस्ट कार्यालयातील कपाटात १६ पिशव्यांमध्ये उपकार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम ३१ आॅगस्ट रोजी ठेवण्यात आलेली होती. ही रक्कम त्या त्या ठिकाणी १ तारखेला पगारासाठी पोच केली जात असे. हीच पगाराची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. तालुक्यातील ३० कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम महिन्याच्या शेवटी कपाटात ठेवली जाते. (वार्ताहर)