शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षात विसरलेली रक्कम चालकाने केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 23:28 IST

महापे-शीळफाटा मार्गावरची घटना : जनार्दन वावले यांचा प्रामाणिकपणा

नवी मुंबई : रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे रिक्षात हरवलेली ८ हजार रुपयांची रोकड असलेली पर्स एका प्रवाशाला सुखरूप परत मिळाली. हा प्रकार मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडला. रिक्षाचालक जनार्दन वावले यांच्यासह महापे ते शीळफाटा असा रिक्षा व्यवसाय करणाऱ्या ठाणे जिल्हा आॅटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने या प्रवाशाचा शोध घेण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली.

रिक्षाचालक जनार्दन श्रीरंग वावले (रा. शीळगाव, सावित्रीनगर) यांच्या रिक्षात मंगळवारी दुपारी महापे - शीळफाटा या मार्गावरून एक प्रवासी रिक्षात बसला. इच्छित स्थळी तो उतरून गेला. या रिक्षाचालकाने सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी रिक्षा उभी केली असता अचानक त्यांची नजर रिक्षाच्या मागील सीटवर असलेल्या पर्सकडे गेली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ठाणे जिल्हा रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे विभाग अध्यक्ष विनोद वासकर यांच्याशी संपर्क साधून रिक्षाचालकांच्या उपस्थितीत ८ हजार रुपयांची रोकड असलेली पर्स ज्या प्रवाशाची विसरलेली होती, त्याचा शोध घेत त्याला परत करून माणुसकीचे दर्शन घडविले. ज्या प्रवाशाचे ८ हजार रुपये रोख, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि काही वस्तू खरेदी केल्याची बिले आदी महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स प्रामाणिकपणे प्रवाशाला परत करण्यात आली.१७ सप्टेंबर रोजी रिक्षाचालक जनार्दन वावले यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर ते मंगळवारी पहिल्याच दिवशी रिक्षा व्यवसायाला निघाले असताना हा प्रकार घडला. 

टॅग्स :Raigadरायगड