शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

स्वदेश व नॅबफीसचा करार

By admin | Updated: May 2, 2017 03:09 IST

नाबार्ड फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड (नॅबफीस) यांच्या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दक्षिण रायगडमध्ये स्वदेश फाउंडेशनबरोबर

महाड : नाबार्ड फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड (नॅबफीस) यांच्या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दक्षिण रायगडमध्ये स्वदेश फाउंडेशनबरोबर शनिवारी सामंजस्य करार झाला. शेतकऱ्यांना पशुपालन, अन्नप्रक्रिया व स्वयंसाहाय्यता गटांना छोटे व मध्यम स्वरूपाचे उद्योग सुरू करण्यासाठी स्वदेश फाउंडेशनचे ग्रामीण भागात प्रयत्न केले जात असून, या सामंजस्य करारामुळे या प्रक्रियेला आता अधिक चालना मिळणार आहे. स्वदेश फाउंडेशन व नॅबफीस यांच्या वतीने यावर्षी २५०० ग्रामीण उद्योजकांना दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यल्प दराने कर्जपुरवठा करून या उद्योजकांना व्यवसायवाढीसाठी सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येत आहे.स्वदेश व नॅबफीस यांच्यात शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मृती स्मारकात शेतकरी मेळाव्यात या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या वेळी नॅबफीसचे चेअरमन जे. के. मोहपात्रा, स्वदेश फाउंडेशनचे विश्वस्त रॉनी स्क्रूवाला, विश्वस्त झरिना स्क्रू वाला, मंगेश वांगे, मुख्य संचलन अधिकारी, गटविकास अधिकारी नितीन मंडलिक, व्यवस्थापकीय संचालक बी. एस. पुराण आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ४७ शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायासाठी कर्जवाटप करण्यात आले. या वेळी लक्ष्मी टेंबे, विठ्ठल चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले.