शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

दिवेआगर सुवर्णगणेश चोरी प्रकरण : देवस्थानला सोने परत देण्याबाबत गृहमंत्री सकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 6:49 AM

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर सुवर्ण गणेशमूर्ती चोरी प्रकरणातील सोने देवस्थान ट्रस्टकडे देण्याच्या दृष्टीने रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह देवस्थान ट्रस्टीच्या पदाधिकारी, ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली.

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर सुवर्ण गणेशमूर्ती चोरी प्रकरणातील सोने देवस्थान ट्रस्टकडे देण्याच्या दृष्टीने रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह देवस्थान ट्रस्टीच्या पदाधिकारी, ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. या वेळी देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे सुवर्णगणेशाची मूर्ती प्रकटल्याने दिवेआगरची एक नवी ओळख जगासमोर आली. प्राचीन सुवर्ण गणेशमूर्ती पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांच्या रांगा दिवेआगरमध्ये लागत असत. काही काळातच पर्यटन क्षेत्र म्हणून दिवेआगरची प्रसिद्धी वाढली, आणि २१ मार्च २०१२ रोजी दरोडेखोरांनी ही सुवर्णमूर्ती चोरून नेली. दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले; आणि मूळ मूर्तीचे सोने सरकार दप्तरी जमा झाले. या मूर्तीमध्ये लाखो भाविकांच्या धार्मिक भावना दडल्या आहेत, त्याचबरोबर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली ही गणेशमूर्ती मूळ सोन्यात प्रतिकृती घडवावी अशी असंख्य भाविकांची मागणी आहे. त्यामुळे येथील खुंटलेल्या पर्यटन व्यवसायासही पुन्हा चालना मिळेल व भाविकांची मूर्तीप्रति असलेली आस्था कायम टिकून राहील. या सर्व बाबी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष व ग्रामस्थांनी सांगितल्या. यावर तत्काळ कायदेशीर बाबींची पूर्तता करून मूर्तीचे सरकार दप्तरी जमा असलेले सोने देवस्थानाकडे परत देण्यासाठीची सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली असल्याची माहिती दिवेआगर सुवर्णगणेश देवस्थान गणपती देव पूजा नेमणूक ट्रस्ट अध्यक्ष महेश पिळणकर यांनी दिली. राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीच्या वेळी देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष महेश पिळणकर, सदस्य उदय बापट, लाला जोशी व ग्रामस्थ उपस्थित होते.पर्यटनाला चालना मिळेलदिवेआगर येथे सुवर्णगणेशाची मूर्तीची मूळ सोन्यात प्रतिकृती घडवण्याची अनेकांची मागणी आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळू शकेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Raigadरायगड