शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

अलिबाग मतदारसंघात धुसफूस; स्थानिक नेते, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 11:37 PM

युती, आघाडीच्या उमेदवारांचा लागणार कस

- जयंत धुळपलोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होताच रविवारी आचारसंहिताही लागू झाली. रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्ष सोमवारपासून निवडणुकीकरिता सज्ज झाले असले, तरी प्रमुख लढत विद्यमान खासदार युतीचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप या आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यामध्ये होणार हे स्पष्ट आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अलिबाग विधानसभा मतदारसंघात ‘आघाडी’ आणि ‘युती’मधील अंतर्गत धुसफूस पेटण्याआधीच विझवण्याचे काम दोन्ही उमेदवारांना करावे लागणार आहे.शेकापची साथ तटकरेंसाठी जमेची बाजूमागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात असलेला शेकाप यावेळी तटकरे यांच्या सोबत आहे. रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापची सत्ता, अलिबाग पंचायत समितीत आणि अलिबाग नगरपालिका यामध्ये शेकापची सत्ता, तालुक्यांतील बहुतांश ग्रामपंचायती शेकापच्या ताब्यात तर रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक देखील शेकापच्या ताब्यात आहे. अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघातील शेकापचे आमदार पंडित पाटील यांचा पाठिंबाही तटकरेंसाठी मोठी जमेची बाजू आहे.जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचे आघाडीचा धर्म निभावण्याचे आदेशअलिबागमधील काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या गटाची नाराजी तटकरे यांना दूर करावी लागेल अशी अपेक्षा काँग्रेसजनांची आहे. दरम्यान, शुक्रवारी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील काँग्रेस भुवनमध्ये घेतलेल्या पक्षाच्या सभेत, आघाडीबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला असून काँग्रेसला आघाडीचाच धर्म निभावावा लागेल, हे ठणकावून सांगितले. या निर्णयास बैठकीत समर्थनही मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार ठाकूर वेगळी चूल मांडणार नाहीत, मात्र तटकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधावा, अशी अपेक्षा काँग्रेसजनांची आहे.विरोधी भूमिकांमुळे संभ्रमशिवसेना-भाजपा युतीचे विद्यमान खासदार, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या गेल्या पाच वर्षांतील कार्यप्रणालीबाबत अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपामध्ये नाराजी सातत्याने ऐकायला मिळते. येथे भाजपाला विश्वासात घेतले जात नाही अशी तक्रार भाजपा कार्यकर्त्यांची आहे. केंद्रीय योजना ज्या प्रमाणात रायगडमध्ये येणे अपेक्षित होत्या त्या प्रमाणात त्या आल्या नाहीत आणि ज्या आल्या त्यामध्ये येथील भाजपाला विचारात घेतले गेले नाही.सेना-भाजपा केवळ लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच दिसते, गेल्या पाच वर्षांच्या काळात सेना-भाजपा कोणत्याही संयुक्त उपक्रमात वा कार्यक्रमात दिसून आले नाहीत. त्याचबरोबर राज्याच्या सत्तेत असताना सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील भूमिका स्वीकारणारी शिवसेना आता केवळ निवडणुकीकरिता युती करीत आहे, याचे शल्य गेली अनेक वर्षे भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आहे. यातून भाजपामध्ये असणारी धुसफूस दूर करणे गीतेंसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा