शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

डिजिटल इंडियाचा जिल्ह्यात बोजवारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 11:22 PM

कागदपत्रांसह विवाह नोंदणीही रखडली; इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने दिवसाला एक कोटी रुपयांचा फटका

- आविष्कार देसाई अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने डिजिटल इंडिया योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येते. जिल्ह्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या दुय्यम निबंधक विभागात महत्त्वाच्या कागदपत्रांचे रजिस्ट्रेशन होत नाही, तसेच विवाह करणाऱ्यांचीही नोंद होत नसल्याने दिवसाला सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरून कामानिमित्त येणाºयांना हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने विविध प्रकल्पांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सुरू असणाºया तसेच प्रस्तावित प्रकल्पांमुळे येथील जमिनी, घर, वाडी, फ्लॅट यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत; परंतु सातत्याने इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने विविध कागदपत्र, दस्त यांची नोंदणीच होत नाही. त्यामुळे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी भरली जात नसल्याने रोजच्या मिळणाºया महसुलात तूट पडत आहे.या कार्यालयांमध्ये विविध प्रकारचे दिवसाला सुमारे ३० ट्रान्जेक्शन होत असतात. त्यामार्फत सरकारला दिवसाला सुमारे एक कोटी रुपयांपर्यंतचा महसूल मिळतो. कधी-कधी हा आकडा कमीही असतो; परंतु इंटरनेट सेवा सुरळीत नसल्यानेच महसूल मिळण्यावर परिणाम होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून अशीच परिस्थिती उद्भवत असल्याने आतापर्यंत सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ढोबळ अंदाज आहे.इंटरनेट सेवा नसल्याने टायपिंग करणारे, झेरॉक्स सेंटर यांनाही आर्थिक नुकसानीचा फटका सहन करवा लागत आहे. दररोज दस्तनोंदणीसाठी नागरिक येत असतात. मात्र, इंटरेनट सेवा सुरळीत नसल्याने आम्हालाही काम राहत नाही, असे झेरॉक्स आणि टायपिंग करणाºयांनी सांगितले.पर्यायी व्यवस्थेची गरज- राकेश पाटीलप्रभावीपणे आणि हुकमी उत्पन्न देणाºया जिल्हा दुय्यम निबंधक विभागाचे कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी सरकारसह जिल्हा प्रशासनाने त्यांना पर्यायी व्यवस्था करून देणे गरजेचे आहे.सरकार डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत आहे. सर्व व्यवहार पारदर्शक होण्यासाठी आॅनलाइनवर भर दिला जात आहे. मात्र, इंटरनेट सेवेची कनेक्टिव्हिटी नसल्याने डिजिटल इंडियाचा बोजवारा उडाला आहे, असे अ‍ॅड. राकेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दस्त नोंदणीसाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र, त्यांची कामे होत नसल्याने त्यांना हात हलवत परत जावे लागत असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी स्पष्ट केले.सातत्याने इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने त्याचा विपरित परिणाम दैनंदिन कामावर होत आहे. कामच ठप्प पडल्याने दररोजच्या महसुली उत्पन्नालाही फटका बसत आहे. इंटरनेट सेवेत अडथळा येत असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची तयारी सुरू आहे.- शैलेंद्र साटम,जिल्हा दुय्यम निबंधकच्फ्लॅटची विक्री तसेच फ्लॅट, जमीन भाड्याने देणे, अशा व्यवहारांची रीतसर नोंदणी करण्यासाठी नागरिकांना दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात जावे लागते. त्यामुळे सरकारी फी भरून नोंदणी करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून इंटरनेट सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने ताटकळत बसावे लागते. वेळेचा आणि पैशाचाही अपव्यय होत असल्याने संबंधित यंत्रणेने याबाबत पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे,

टॅग्स :digitalडिजिटल