दाट धुक्याने केला घात; बस ५० फूट दरीत; २२ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 08:38 IST2025-11-25T08:37:37+5:302025-11-25T08:38:06+5:30
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर भोगावनजीक सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास खासगी बस ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले. त्यांपैकी १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

दाट धुक्याने केला घात; बस ५० फूट दरीत; २२ जखमी
पोलादपूर - मुंबई-गोवा महामार्गावर भोगावनजीक सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास खासगी बस ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले. त्यांपैकी १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्याहून खेडकडे जाताना हा अपघात घडला. दाट धुक्यामुळे चालकाला पुलावरील बॅरिकेड्स दिसले नाहीत. त्यामुळे बॅरिकेड्सला तोडून बस दरीत कोसळली.
अपघातानंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू करत जखमींना वर काढले. घटनेबाबत कळताच पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली होती. दाट धुक्यामुळे अपघात घडल्याचे अंदाज आहे.