शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

‘टाइम्स स्क्वेअर’मध्ये दहीहंडी अधांतरी

By admin | Updated: September 11, 2014 01:17 IST

यंदा भारतात नोव्हेंबरमध्ये दिवाळी साजरी होणार आहे. मात्र त्याआधीच या महिन्यातच अमेरिकेत दिवाळीचे फटाके फुटतील.

मुंबई : यंदा भारतात नोव्हेंबरमध्ये दिवाळी साजरी होणार आहे. मात्र त्याआधीच या महिन्यातच अमेरिकेत दिवाळीचे फटाके फुटतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकेतील ‘टाइम्स स्क्वेअर’ फेस्टिव्हलमध्ये दीपोत्सव साजरा करणार आहे. परंतु, यंदा मात्र फेस्टिव्हलमध्ये दहीहंडीच्या समावेशाबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. फेस्टिव्हलसाठी लागणाऱ्या निधीची जबाबदारी गोविंदा पथकांच्या खांद्यावर आल्यामुळे दहीहंडीचे थर ‘अधांतरी’ असल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी मल्लखांबाचा चमू अमेरिकेला रवाना करण्यात आला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये घोर निराशा पसरली असून या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ते मंत्र्यांकडे साकडे घालत आहेत.न्यूयॉर्क येथील ‘टाइम्स स्क्वेअर’ या प्रेक्षणीय स्थळाला दररोज हजारो पर्यटक भेट देतात. त्यामुळे याला वेगळे महत्त्व आहे. या ठिकाणी यंदा महाराष्ट्राची पताका झळकणार असून येत्या २० सप्टेंबरलाही हा फेस्टिव्हल दणक्यात साजरा होणार आहे. यंदा या फेस्टिव्हलमध्ये गोपिकांचा ‘थरथराट’ अनुभवण्याची संधी मिळणार होती. परंतु आता मात्र या फेस्टिव्हलमध्ये मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहायला मिळतील. यंदा या फेस्टिव्हलमध्ये मुंबईतील राजेश मुडकी यांचा मल्लखांबाचा चमू सादरीकरण करणार आहे. या फेस्टिव्हलसाठी एकूण १८ मल्लखांबपटूचा चमू अमेरिकेला रवाना झाला आहे. गोविंदा पथकांना डावलल्यामुळे पथकांमध्ये निरुत्साह असून फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी पर्यटन मंत्र्यांपासून दहीहंडी आयोजकांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी हा अखेरचा आठवडा असून मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी महिला गोविंदा पथके समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली येरझा-या  घालत आहेत.(प्रतिनिधी)