Cyclone Nisarga: 'मदतीपासून काेणीही वंचित राहणार नाही सरकार खंबीरपणे पाठीशी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 15:27 IST2020-06-13T14:53:50+5:302020-06-13T15:27:10+5:30

रायगड जिल्ह्यात लाखाे घरांची पडझड झाली आहे, तर हजाराे हेक्टर बागायतींचे क्षेत्र उध्वस्त झाले आहे.

cyclone nisarga don't worry Government strongly support says balasaheb thorat | Cyclone Nisarga: 'मदतीपासून काेणीही वंचित राहणार नाही सरकार खंबीरपणे पाठीशी'

Cyclone Nisarga: 'मदतीपासून काेणीही वंचित राहणार नाही सरकार खंबीरपणे पाठीशी'

अलिबाग - मदतीपासून काेणीही वंचित राहणार नाही सरकार खंबीरपणे पाठीशी आहे, अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी दिली.  3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्याची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात हे एक दिवसाच्या काेकण दाैऱ्यावर आले आहेत. सुरुवातीला त्यांनी अलिबाग तालुक्यातील नागाव आणि चाैल येथील नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर ते मुरुड तालुक्याकडे रवाना झाले. तेथून ते श्रीवर्धन तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

रायगड जिल्ह्यात लाखाे घरांची पडझड झाली आहे, तर हजाराे हेक्टर बागायतींचे क्षेत्र उध्वस्त झाले आहे. विजेचे खांब, विजेच्या तारा यांचीही माेठ्या संख्येने पडझड झाल्याने आजही शेकडाे गावे अंधारातच आहेत. रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याचेही माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काेकणी जनतेला तातडीने मदतीचा हात तसेच आधार देण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात हे एक दिवसाच्या काेकण दाैऱ्यावर आले.

सर्वप्रथम त्यांनी अलिबाग तालुक्यातील नागाव, चाैल येथील नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी थेट नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काेकणातील नागरिकांना याेग्यती मदत देण्याचे काम सरकारने युद्ध पातळीवर सुरू केले आहे. काेणीही मदतीपासूनच वंचित राहणार नाहीत याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. नागाव ग्रामपंचायतीमधील  नुकसानग्रस्त नागरिकांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी शारदा पवार, तहसिलदार सचिन शेजाळ यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! येत्या 24 तासांत मान्सून होणार दाखल 

माणुसकीला काळीमा! फोटोसाठी छाव्याचे केले असे हाल; अवस्था पाहून डोळ्यात येईल पाणी

CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई

पाकिस्तानातील गाढवांची संख्या वाढली; 'या' देशासाठी फायदेशीर ठरली

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...

 

Web Title: cyclone nisarga don't worry Government strongly support says balasaheb thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.