CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 11:42 AM2020-06-13T11:42:23+5:302020-06-13T12:00:02+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: चार महिन्यांच्या चिमुकलीने कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याची घटना घडली आहे.

CoronaVirus Marathi News 4 month baby recovers COVID19 18 days ventilator | CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई

CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई

Next

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच दरम्यान काही दिलासादायक घटनादेखील समोर येत आहे. 

तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या एका बाळाने कोरोनाची लढाई जिंकली आहे. चार महिन्यांच्या चिमुकलीने कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याची घटना घडली आहे. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चार महिन्यांच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती थोडी गंभीर असल्याने 18 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. चिमुकलीचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

जिल्हाधिकारी विनय चंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदावरी पूर्व परिसरात आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट आला. त्यानंतर तिच्या 4 महिन्यांच्या बाळाची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये चिमुकलीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. विशाखापट्टणम येथील VIMS रुग्णालयात तिला हलवण्यात आले. 18 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्यानंतर चिमुकलीने आता कोरोनाचं युद्ध जिंकलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 11,458 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 8884 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 308993 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आठ हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानातील गाढवांची संख्या वाढली; 'या' देशासाठी फायदेशीर ठरली

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...

Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

CoronaVirus News : काय सांगता? PPE किट घालून कोरोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातून काढला पळ

CoronaVirus News : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

Web Title: CoronaVirus Marathi News 4 month baby recovers COVID19 18 days ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.