पाकिस्तानातील गाढवांची संख्या वाढली; 'या' देशासाठी फायदेशीर ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 11:07 AM2020-06-13T11:07:13+5:302020-06-13T11:11:39+5:30

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली आहे. मात्र नव्या आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानातील गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

pakistan one lakh donkeys increased 80 thousand will be sent to china | पाकिस्तानातील गाढवांची संख्या वाढली; 'या' देशासाठी फायदेशीर ठरली

पाकिस्तानातील गाढवांची संख्या वाढली; 'या' देशासाठी फायदेशीर ठरली

Next

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली आहे. मात्र नव्या आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानातील गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तान सरकारचे आर्थिक सल्लागार अब्दुल हफिज शेख यांनी आर्थिक सर्वेक्षण 2019-20 मध्ये देशातील गाढवांची संख्येत 1 लाखांची वाढ झाली. या वाढीनंतर देशातील गाढवांची एकूण संख्या 55 लाखांपेक्षा अधिक झाल्याची माहिती दिली आहे. 

गाढवांसदर्भात पाकिस्तान आणि चीन यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या करारानुसार पाकिस्तान दरवर्षी 80 हजार गाढवं चीनला पाठवतो. चीनमध्ये त्याचा वापर मांसासाठी आणि अन्य गोष्टीसाठी केला जातो. तसेच गाढवांच्या कातडीचाही उपयोग चीनमध्ये विविध प्रकारे करण्यात येतो. त्यांच्या कातडीपासून मिळालेल्या जिलेटिनपासून अनेक प्रकारची औषधंही तयार केली जातात.

चीनच्या काही कंपन्यांनी पाकिस्तानातील गाढवांच्या व्यापारात लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. पाकिस्तान जगातील तिसऱ्या क्रमांकाचा गाढवांची संख्या अधिक असलेला देश आहे. गाढवांच्या प्रकारानुसार त्यांचे दर निश्चित केले जातात. रिपोर्टनुसार, पाकिस्तानात एका गाढवाच्या कातडीसाठी 15 ते 20 हजार घेतले जातात. याची विक्री करून पाकिस्तान मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहे. तसेच पाकिस्तानात  गाढवांच्या उपचारांसाठी विशेष रुग्णालये देखील आहेत. एका हिंद वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...

Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

CoronaVirus News : काय सांगता? PPE किट घालून कोरोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातून काढला पळ

CoronaVirus News : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

Web Title: pakistan one lakh donkeys increased 80 thousand will be sent to china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.