शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

coronavirus: कोरोनाबाधितांनी ओलांडला पाच हजारांचा आकडा पण रायगडमध्ये नागरिकांना गांभीर्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 00:33 IST

सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, नाका-तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसून आले, तर काहींनी नियम पायदळी तुडवल्याचे ‘लोकमत’ने घेतलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये दिसून आले.

रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या आकड्याने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. १५४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २,९०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, नाका-तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसून आले, तर काहींनी नियम पायदळी तुडवल्याचे ‘लोकमत’ने घेतलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये दिसून आले.अलिबागमध्ये पोलीस करत आहेत मास्कबाबत जागृतीनिखिल म्हात्रेअलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता नागरिक सज्ज झाले असून त्यांनी मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. सर्दी, खोकला किंवा फ्ल्यूसदृश लक्षणे असल्यास मास्क अधीक होऊ लागला आहे. तर आपल्यासह आपण दुसऱ्या व्यक्तींना संसर्ग होऊ नये, यासाठी सध्या नागरिकांची धडपड सुरु आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणुचा संसर्ग वाढल्यापासून मास्कची खरेदी वाढली आहे. खरेदी केलेले मास्क पुन्हा एकदा निर्जंतूक करून नागरिक त्याचा वापर करीत आहेत. नागरिकांनी आता समजूतदार पणा दाखवून स्वत: काळजी घेण सुरु केले आहे. एन ९५ मास्क हा कोरोना विषाणुंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका तेथील कर्मचाऱ्यांसाठी अधिक वापर होत आहे. हा मास्कघालण्यापूर्वी त्यातून हवा थेट आत जाणार नाही, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे तो मास्क घालण्याची शास्त्रीय पद्धत आहे. त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. सर्वसामान्य नागरिक आता हा मास्क सर्रास वापरताना दिसत आहेत. एकच मास्क वारंवार वापरणेदेखील आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. त्यामुळे रुग्णालयात काम करणाºयांशिवाय इतरांनी हा मास्क घालणे टाळावे,असा सल्लाही देण्यात आला आहे. अलिबाग शहरात नागरिकांच्या सुरक्षीततेसाठी अलिबाग पोलीस ही पुढे आले असून शहरात फिरणाºया प्रत्येकाकडे मास्क आहे की नाही याची पडताळणी घेतली जात आहे. एखाद्याकडे मास्क नसेल तर डयुटीवर असलेला पोलीस स्वत: आपल्याकडे राखीव असलेला मास्क देत मास्क लाऊनच पुढे त्यांना पाठवित आहेत. तसेच पुढच्यावेळी मास्क घालूनच बाहेर पडा नाहीतर कारवाई अटळ असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व दुकानदार येणाºया आपल्या ग्राहकांच्या हातावर सॅनिटायरचा स्प्रे देऊनच दुकानात प्रवेश देत आहेत. तसेच आलेल्या ग्राहकाला स्वत:ची काळजी घेण्याचे अवाहन करून मास्क व सॅनिटायरचा वापर करा असे सांगण्यात येत असल्याचे एका दुकानाचे मालक अंकुश टोपले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पोलादपूर शहरात बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा- प्रकाश कदम१पोलादपूर : महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार जरी अनलॉक २ ची प्रकिया सुरू झाली असली, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत नाही. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडल्यावर आपली स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तोंडाला मास्क लावणे व सोशल डिस्टन्स ठेवणे हे उपाय सरकारने सुचविले आहेत. पोलादपूर शहर सद्यस्थितीमध्ये कोरोनामुक्त आहे. त्यामुळे नागरिक विनामास्क फिरताना, गर्दी करताना दिसून येत आहेत.२बँकांमध्ये सामाजिक अंतर राखण्याचे पालन होत नसल्याने दिसून येते. बाजारपेठेत सर्वत्र दुचाकी वाहनांची गर्दी दिसते. भाजीपाला विक्रेते, स्वीट मार्ट, वडापाव सेंटर येथे नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. मात्र, सामाजिक अंतराची ऐशीतैशी केल्याचे दिसते. ना दुकानदार याबाबत त्यांना सूचना करत ना स्वत: नागरिक याबाबत जागरूकता दाखवत. सर्वत्र नगरिकांचा मुक्त संचार असल्यासारखी परिस्थिती आहे.३याबाबत दोन दिवस आधी मुख्याधिकारी विराज लबडे यांनी सूचना केल्या आहेत. मात्र, नागरिक तिकडे दुर्लक्ष करत आहेत. आपले आरोग्य आपल्या हातात आहे. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या निरोगी आरोग्यासाठी कोरोनाबाबतच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करा, अशी विनंती पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी केली आहे.बोर्ली-मांडलामध्ये होतेय नियमांचे पालनराजीव नेवासेकरबोर्ली-मांडला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. जे मास्क वापरणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मुरुड तालुक्यातील बोर्ली गावात बाजारपेठेत काही नागरिक वगळता बहुतेक लोक कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरत असून, सोशल डिस्टन्स पाळत आहेत. कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, बोर्ली-मांडला पंचक्रोशीतील लोकांना मास्क, सोशल डिस्टन्सचे महत्त्व समजले असून, नियमांचे पालन केले जात आहे.तळा बाजारपेठेत नागरिकांचा मास्क न लावताच वावर- श्रीकांत नांदगावकरतळा : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना, तळा तालुक्यातील नागरिक अजूनही या महाभयंकर रोगाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत.तळा बाजारपेठेत बहुतांश नागरिक हे मास्क न लावताच वावरत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यांसह सामाजिक अंतराचा नियम न पाळता, नागरिक बिनधास्त गर्दी करीत आहेत.तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचे जराही गांभीर्य नागरिकांना नसल्याचे स्पष्ट होते. नगरपंचायतीकडून कोरोनाला रोखण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत नियम व सूचना दिल्या असताना, त्याचे जराही पालनन करता, त्याकडे लक्ष न देता नागरिकांनी एकप्रकारे नगरपंचायतीच्या आदेशालाकेराची टोपली दाखविलीआहे.त्यामुळे नगरपंचायतीने बाजारपेठेत मास्क न वापरणाºया, तसेच एकाच ठिकाणी गर्दी करणाºया नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.मोहोपाडा येथे सामाजिक अंतराकडे दुर्लक्षबाळासाहेब सावर्डेरसायनी : मोहोपाड्यात २२ मेनंतर कोरोनाने शिरकाव केला. रविवार, ५ जुलै रोजी दुपारपर्यंत मोहोपाडा व चांभार्ली ग्रामपंचायत हद्दीत ५७ कोरोनाबाधित होते. त्यातील १७ जण बरेही झाले आहेत. संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी मोहोपाडा व चांभार्ली ग्रामपंचायतींनी २ ते ५ जुलै असा चार दिवसांचा जनता कर्फ्यू पाळला. त्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सोमवारी मोहोपाडा बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली. मास्क सर्वांनी बांधले होते, पण जागेच्या अभावामुळे सामाजिक अंतराच्या नियमाचा नागरिकांना विसर पडत होता.मोहोपाडा ग्रामपंचायतीने केलेल्या जनजागृृृृतीमुळे व सोशल मीडियावरील माहितीमुळे मोहोपाडा-रसायनी परिसरात मास्क वापराचे महत्त्व चांगले समजले आहे. मोहोपाड्यात एटीएम सेंटर्स व बँकांच्या रांगांमध्ये नागरिक मास्क बांधून राहतात. बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी अजून काही जण नाकाखाली मास्क व रुमाल असेल, तर गळ्याळा लावून फिरतात. त्यामुळे मास्क न वापरणारे व चुकीच्या पद्धतीने लावणाºयांना ग्रामपंचायतीने दंड करावा, असे दक्ष नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई