शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

coronavirus: कर्जत तालुक्यात वाहतूक पोलिसासह नवीन १५ रुग्ण, एकू ण बाधितांचा आकडा २११ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 11:53 PM

शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे चिंताजनक वातावरण झाले आहे.

कर्जत : तालुक्यात कोरोनाचा पसारा वाढला आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे चिंताजनक वातावरण झाले आहे. बुधवारी २५ रुग्ण वाढल्याने अधिक चिंता वाटत असताना गुरुवारी १५ नवीन रुग्णांचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आत्तापर्यंतची रुग्णांची संख्या १२२ वर गेली आहे. तर एका ६३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये महामार्ग पोलीस विभागात काम करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाºयाचा समावेश आहे.दहिवली संजयनगरमधील ८० वर्षांच्या एक व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असून या व्यक्तीच्या पायाला फॅक्चर झाल्याने ती व्यक्ती उपचारासाठी खोपोली आदी ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जात होती. आमराई भागातील एका इमारतीमधील एका ४३ वर्षीय व्यक्तीचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती महामार्ग पोलीस विभागात बोरघाटात वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत आहे. मुद्रे बुद्रुक विभागात राहणाºया ५४ वर्षांच्या महिलेलासुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे तर उक्रु ळ येथील ३४ वर्षीय युवक कोरोनाने बाधित झाला आहे. हा युवक अंबरनाथ येथे नोकरीस जात होता.किरवली गावातील एका ५२ वर्षीय महिलेचा कोरोना टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला असून ती माजी उपसरपंचाची आई आहे. नेरळ शहरातील शिवाजी मैदानजवळ राहणाºया ज्या ४३ वर्षीय महिलेचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्या महिलेच्या ४५ वर्षांच्या पतीचा कोरोना रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. तसेच सुगवे येथील एका तरुणाच्या २३ वर्षीय पत्नीला कोरोनाची बाधा झाली आहे. काही दिवसांपूर्वी नेरळमधील एका खाजगी डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली होती. त्याच्या ११ वर्षीय मुलाचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नेरळच्या सुगवेकर आळीमधील ५२ वर्षीय व्यक्ती व नेरळ वाल्मिकी नगरमध्ये राहणाºया ४४ वर्षीय व्यक्तीची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच नेरळच्या सम्राटनगरमध्ये राहणाºया २७ वर्षीय महिलेलासुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या २११ वर पोहोचली आहे.माय - लेक पॉझिटिव्हकर्जत शहरातील कोतवालनगरमधील माय-लेकाचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यातील ३० वर्षीय मुलगा स्थानिक आमदाराचा निकटचा कार्यकर्ता आहे. त्याची आई ५५ वर्षांची आहे. तेथीलच आणखी एका ४५ वर्षीय व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपली कोरोना टेस्ट करून घेतली असता ती निगेटिव्ह आली होती. ही व्यक्ती कर्जत नगर परिषदेत स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत आहे. कोतवालनगरमधीलच एक ५० वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असून ही व्यक्ती मुंबई महापालिकेत कामाला आहे.म्हसळ्यात २२ जणांना बाधाम्हसळा : शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व हाय रिस्कवाले रुग्ण बाजारात सर्रास मुक्त संचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला व एका कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना बाजारात पाहून संपूर्ण बाजारपेठेत एकच धावपळ उडाल्याचे चित्र होते.म्हसळ्यामध्ये गुरुवारी नव्याने २२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, यामध्ये दोन तलाठी, एक पोलीस कर्मचारी, स्टेट बँकेचा कॅशियर व एका शिक्षकाचा समावेश असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ५ रुग्ण कुंभारवाडा परिसरातील, ४ रुग्ण गौलवाडी, ४ रुग्ण कन्याशाळा परिसर व इतर ६ रुग्ण शहरातील इतर भागात राहतात. ग्रामीण भागात पाभरा, पेडांबे, वाडांबा येथून प्रत्येकी एक पॉझिटिव्ह असल्याचे प्राप्त झालेल्या अहवलातून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड