शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: नेरळजवळील वृद्धाश्रमातील ११ जण कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 23:40 IST

नेरळनजीकच्या डीग्निटी लाइफस्टाइल या वृद्धाश्रमातील तब्बल ११ जणांना कोरोनाची बाधा झाली असून आत्तापर्यंत तेथे १३ रुग्ण सापडले आहेत.

कर्जत : तालुक्यात गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र बुधवारी तालुक्यात २५ रुग्ण आढळले. हा आत्तापर्यंतचा उच्चांक आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १८ रुग्ण आहेत. नेरळनजीकच्या डीग्निटी लाइफस्टाइल या वृद्धाश्रमातील तब्बल ११ जणांना कोरोनाची बाधा झाली असून आत्तापर्यंत तेथे १३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तो कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालल्याचे दिसत आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या १९६ वर पोहोचली आहे.बोरवाडी येथील उत्तरकार्यात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे तीस जणांना कोरोनाची बाधा झाली होती. परंतु नंतर त्यामध्ये वाढ न झाल्याने ती साखळी तुटली होती. मात्र आता नेरळनजीकच्या माणगाव येथील लाइफस्टाइल या वृद्धाश्रमात ५ जुलै रोजी एका ७१ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला. ७ जुलै रोजी येथील ८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. आणि बुधवार, ८ जुलै रोजी येथील तब्बल ११ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. यामध्ये बाजूच्या आंबिवली गावातील पाच तर माणगावमधील दोन, कोल्हारे, कुंडलज, नेरळ टेपआळी, नेरळ कोंबल वाडी येथील प्रत्येकी एक कामगार आणि दोन कामगार तेथे राहून आहेत. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात दोन महिला आहेत. हे सर्व २० ते ४६ वयोगटातील आहेत.कर्जत - कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतीमध्ये माणगाव गावाच्या हद्दीत डीग्निटी लाइफस्टाइल नावाने वृद्धाश्रम आहे. येथे १५० ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. सध्या तेथे राहणारे आणि अन्य कामगार यांची संख्या २०० हून अधिक आहे. त्यात कोरोना विषाणूचा संसर्ग हा जेष्ठ नागरिक, वयोवृद्ध आणि अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना त्रासदायक ठरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कर्जतमधील बाधितांचे प्रमाण वाढत असल्याने चिंतेचे वातावरणकर्जत शहरातील दहिवली भागातील कोंकण आळीत राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तो मोहपाडा येथील एका मोबाइलच्या दुकानात काम करीत आहे. दहिवलीतीलच ८३ व ५७ वर्षांच्या व्यक्तींनाही कोरोनाची बाधा झाली आहे. शहरातील मुद्रे बुद्रूक भागातील २७ वर्षांच्या युवकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.तसेच कडाव या गावात राहणाºया एका ३५ वर्षांच्या अभियंत्याला कोरोनाची बाधा झाली असून तो अभियंता नेहमी अलिबाग येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी जात असे. तो एका राजकीय पक्षाच्या तालुका अध्यक्षांचा सुपुत्र आहे. कडावमधीलच एक जनरल स्टोअर्स चालवणाºया व तेथील बँकेचे बिझनेस करस्पाँडन्सचे काम करणाºया ४२ वर्षीय तरुणाची कोरोना टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह आली असून त्याच्या ६० वर्षीय आईलाही कोरोनाची बाधा झाली आहे.नेरळ शहरातील एका ४३ वर्षीय महिलेचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ती महिला नेरळ ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याची पत्नी आहे. पाषाणे गावातील एका ३१ वर्षांच्या तरुणाला कोरोनाची बाधा झाली असून हा तरुण मूळचा आंबिवली येथील आहे. नेरळनजीकच्या ममदापूर गावातील ५४ व ३८ व्यक्तींच्या कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आदिवासी भागात असलेल्या सुगवे येथील ३१ वर्षांच्या युवकालासुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे.ग्रामपंचायतीने दिले होते पत्र : सरपंच कल्याणी सारंग कराळे यांनी डीग्निटी लाइफस्टाइल या संस्थेला पत्र देऊन सर्व जेष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाच्या कोरोना टेस्ट करण्याची सूचना केली होती. तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनीदेखील डीग्निटी लाइफस्टाइल संस्थेच्या व्यवस्थापनाला पत्र पाठवून काळजी घेण्याची सूचना केली होती. तर कोरोना पॉझिटिव्ह ७१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने ग्रामपंचायतीने आग्रह केल्यामुळे डीग्निटी लाइफस्टाइलच्या व्यवस्थापनाने तत्काळ आपल्याकडे असलेले ज्येष्ठ नागरिक आणि अन्य कामगार अशा तब्बल २१८ जणांच्या कोरोना टेस्ट करून घेतल्या होत्या.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड