रिक्षा स्टॅन्ड मध्ये दुचाकी पार्किंग; 108 दुचाकीवर खारघर वाहतुक शाखेची कारवाई

By वैभव गायकर | Published: April 29, 2024 05:37 PM2024-04-29T17:37:50+5:302024-04-29T17:40:12+5:30

वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काणे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Bike parking in rickshaw stands Action of Kharghar Transport Branch on 108 two-wheelers | रिक्षा स्टॅन्ड मध्ये दुचाकी पार्किंग; 108 दुचाकीवर खारघर वाहतुक शाखेची कारवाई

रिक्षा स्टॅन्ड मध्ये दुचाकी पार्किंग; 108 दुचाकीवर खारघर वाहतुक शाखेची कारवाई

पनवेल : खारघर रेल्वे स्थानकात असलेल्या रिक्षा स्टँडमध्ये टू व्हीलर वाहने पार्क केली जात असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांना वारंवार प्राप्त होत होत्या. या तक्रारींची दखल घेत खारघर वाहतूक शाखेने 108 दुचाकीवर दंडात्मक स्वरूपात इ चलनद्वारे कारवाई करण्यात आली.  सोमवार दि.29 रोजी खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काणे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. सकाळी रिक्षा स्टँड मध्ये पार्क केलेल्या या दुचाकींवर ही कारवाई करण्यात आली. 

यापूर्वी देखील अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती.या कारवाई दरम्यान 500 रुपयांचा दंड प्रथम वेळेत या दुचाकींना लावण्यात आला. दुसऱ्या वेळेला देखील अशा स्वरूपात वाहतुकीचे नियम पाळले गेले नसतील तर तो दंड 1500 पर्यंत असेल अशी माहिती काणे यांनी दिली. खारघर स्टेशन येथील रिक्षा स्टँडमध्ये दुचाकी वाहने लावू नयेत असे आवाहन यावेळी पुन्हा एकदा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काणे यांनी केले.

Web Title: Bike parking in rickshaw stands Action of Kharghar Transport Branch on 108 two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल