Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:43 IST2025-08-21T14:42:56+5:302025-08-21T14:43:55+5:30
Raigad Boat Accident: रायगड समुद्रात बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नौदलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले आहे.

Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
Raigad Boat Accident: रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उरण करंजा रायगड समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. आज बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली आहे. दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याचे समजत आहे. घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफ, आणि नौदालाच्या गस्त नौकाद्वारे बचावकार्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, अपघात कशामुळे झाला, बोटीवर किती खलाशी होते? जिवीत हानी आहे का? किती नुकसान झाले? याबाबत काही खुलासा झालेला नाही. वादळी हवामानामुळे मासेमारी बंदी असतानाही सदरची बोट समुद्रात कशी आली याची माहिती समोर आलेली नाही. ही बोट गुजरातची आहे.
गुजरातची बोट रायगडमध्ये कशी पोहोचली याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सुरू आहे.
रायगडमधील उरण करंजा समुद्रात गुजरातची मासेमारी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता करंजा रिप्स येथे ही दुर्घटना झाली असून, घटनेनंतर सीआयएसएफ आणि नौदालाच्या गस्त नौकाद्वारे तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र अपघाताचे कारण, बोटीवरील खलाशांची… pic.twitter.com/XtG0n9cRiK
— Lokmat (@lokmat) August 21, 2025