रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हा सहसंपर्कप्रमुखांनी हाती बांधले घड्याळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:48 IST2025-12-30T14:47:28+5:302025-12-30T14:48:22+5:30

Raigad NCP Ajit Pawar Group News: प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. 

big blow to thackeray group in raigad kishor jain joins ncp ajit pawar group | रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हा सहसंपर्कप्रमुखांनी हाती बांधले घड्याळ

रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हा सहसंपर्कप्रमुखांनी हाती बांधले घड्याळ

Raigad NCP Ajit Pawar Group News: शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, उप तालुकाप्रमुख गणपत म्हात्रे, नागोठणे विभागप्रमुख संजय भोसले आदींसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. 

महिला विकास मंडळ सभागृह मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला महिला बालविकासमंत्री अदितीताई तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर पाटील, पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते राजीव साबळे उपस्थित होते. 

किशोर जैन यांच्यासमवेत माजी सरपंच मिलिंद धात्रक, माजी सरपंच संतोष नागोठणेकर, मोहन नागोठणेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल महाडीक, कळसुरेचे माजी सरपंच भालचंद्र शिर्के, ग्रामपंचायत सदस्य अजगर मुल्ला, सचिन ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य ॲड. प्रकाश कांबळी, शाखाप्रमुख धनंजय जगताप, असलम शेख, संजय काकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.

 

Web Title: big blow to thackeray group in raigad kishor jain joins ncp ajit pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.