शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेला मोठा धक्का! ७ नगरसेवक ठरले अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:59 IST

पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करून गटनेते संजय कर्णिक यांच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता.

रायगड - म्हसळा नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या ७ नगरसेवकांना पक्षात घेत मंत्री भरत गोगावले यांनी मोठी खेळी केली होती. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे ७ नगरसेवक यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र पक्षांतर बंदीच्या कायद्यातंर्गत या नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदेसेनेला मोठा धक्का मानला जातो.

काही महिन्यांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीत निवडून आलेले राष्ट्रवादीचे ७ नगरसेवक शिंदेसेनेत दाखल झाले होते. या घटनेमुळे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या घटनेची दखल घेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करून गटनेते संजय कर्णिक यांच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या ७ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले आहे. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका या नगरसेवकांवर ठेवला आहे.

कोणावर झाली अपात्रतेची कारवाई?

नगराध्यक्ष फरहिन अजीज बशरतकमल रवींद्र जाधवमेहजबिन नदीन दळवीअसहल असलम कादिरीसुमैया कॉसम आमदानीकादीर म्हसलाईशाहीद जंजिरकर

तटकरे-गोगावले संघर्ष

रायगड जिल्ह्यात शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला संघर्ष कायम चर्चेत आहे. भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. म्हसळा तालुक्यात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे नगर पंचायतीचे राजकारण रंगतदार बनलं होते. याठिकाणी नगराध्यक्षांसह ७ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला होता. मंत्री गोगावले यांनी स्वतः नगर पंचायत कार्यालयात जाऊन नगराध्यक्षा फरहीन बशरत यांना त्यांच्या आसनावर बसवले होते. यावेळी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली होती. मात्र आता या ७ नगरसेवकांना अपात्र केल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या निर्णयामुळे महापालिका निवडणुकीतील नगरसेवकांची पळवापळवी थांबणार का हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Setback for Shinde Sena: 7 Councilors Disqualified in Raigad

Web Summary : In Raigad, seven councilors who defected from NCP to Shinde Sena have been disqualified under the anti-defection law. The District Collector's action is a blow to Shinde's faction amid ongoing political tensions.
टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस