शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

एक्सेल नाक्यालगत विद्युत वाहिनीला आग

By admin | Updated: May 11, 2017 02:05 IST

रोहा-कोलाड रस्त्यावर एक्सेल नाक्यालगत असलेल्या वीज वाहिनीच्या ट्रान्सफॉर्मर व डीपीखाली बुधवारी अचानक आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कधाटाव/ रोहा : रोहा-कोलाड रस्त्यावर एक्सेल नाक्यालगत असलेल्या वीज वाहिनीच्या ट्रान्सफॉर्मर व डीपीखाली बुधवारी अचानक आग लागली. यामुळे परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. अग्निशामक दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणली. मात्र या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्यामुळे संकट टळल्याचे समोर आले आहे.बुधवारी दुपारी ३.३० दरम्यान रोहा- कोलाड रस्त्यावर एक्सेल नाक्यालगत उघडी डीपी व ट्रान्सफॉर्मर संबंधित असलेली विद्युतवाहिनी गरम झाल्याने अचानक आग लागली. या आगीची झळ जवळच जमिनीवर असलेल्या गवताने पेट घेतल्यामुळे याची झळ डीपी व ट्रान्सफॉर्मरला बसली. ट्रान्सफॉर्मरमधील आॅइलची सुद्धा गळती लागल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये ट्रान्सफॉर्मर व डीपीचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती नजीकच्या अग्निशामक दलाला मिळताच अवघ्या काही मिनिटांमध्ये अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. जळालेल्या विद्युत वाहिन्यांमुळे कारखान्यांतील वसाहत, औद्योगिक विकास महामंडळाचे सामायिक सुविधा केंद्र, एम.बी.मोरे फाउंडेशन कॉलेज व इतर परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होतो. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनीचे अधिकारी वानखेडे, नवगणे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर राहून पाहणी केली व दुरु स्तीच्या कामाला सुरुवात केली.