शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पाताळगंगेत पोहायला जाणाऱ्यांनो, सावधान! उद नावाच्या जलचर प्राण्याचा तरुणांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 12:32 AM

पाताळगंगा नदिच्या पाण्यातील हा मुंगसासारखा दिसणारा हल्ला करणारा प्राणी कोणता असावा? याबाबत तरुणांनी नदीकाठच्या शेतकऱ्यांना विचारले असता, त्यांनी ‘उद’प्राणी असल्याचे सांगितले. हा मुंगसासारखा दिसणारा प्राणी अचानक हल्ला करतो. (UD, patalganga)

मोहोपाडा : चांभार्लीतील घोटी परिसरातील पाताळगंगा नदीपात्रात पोहायला गेलेल्या पाच जणांवर ‘उद’या जलचर प्राण्याने हल्ला करून त्यातील तिघांना जखमी केले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निमाण झाले आहे.

चांभार्ली घोटी परिसरातील तलावांजवळ रजत मुंढे, जय म्हात्रे, सौरभ जांभुळकर व आणखी दोघे असे पाच तरुण दुपारच्या सुमारास गेले होते. तेथे पाताळगंगा नदीपात्रात पोहण्याचा मोह या तरुणांना आवरता आला नाही. यावेळी पाताळगंगा नदिपात्रात पोहत असताना, या तरुणांची नजर पाण्यात बुडणाऱ्या प्राण्यावर पडली. पाण्यात बुडणारे कुत्र्याचे पिल्लू असावे, असा त्यांनी अंदाज बांधला व त्याला वाचविण्याकरिता तिघे पोहत पोहत त्याच्याजवळ पोहोचले. यावेळी रजत मुंढे, जय म्हात्रे आणि सौरभ जांभुळकर या तिघांनी लहान पिल्लू समजून वाचवायला जात असताना, त्या जलचर प्राण्याने तिघांवर हल्ला केला. पाण्यात असतानाच या तरुणांच्या पायाला ठिकठिकाणी चावा घेऊन त्यांना जखमी केले.

मुंगसासारखा  दिसणारा प्राणी -पाताळगंगा नदिच्या पाण्यातील हा मुंगसासारखा दिसणारा हल्ला करणारा प्राणी कोणता असावा? याबाबत तरुणांनी नदीकाठच्या शेतकऱ्यांना विचारले असता, त्यांनी ‘उद’प्राणी असल्याचे सांगितले. हा मुंगसासारखा दिसणारा प्राणी अचानक हल्ला करतो. हा प्राणी कुठून व कधी आला, याचा अंदाज नाही. तरी पाताळगंगा नदीत पोहायला जाऊ नये, सावधानता बाळगावी, असा इशारा चांभार्ली ग्रामपंचायत उपसरपंच दत्तात्रेय जांभले यांनी दिला आहे.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणीriverनदी