शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांमुळे अलिबागकर त्रस्त

By admin | Updated: April 26, 2017 00:31 IST

बांधकाम विभागाला रस्ते दुरुस्तीसंदर्भात सातत्याने निवेदन देऊनही त्याकडे लक्ष नसल्याने अलिबाग तालुक्यातील जनता आता संतप्त झाली आहे.

अलिबाग : बांधकाम विभागाला रस्ते दुरुस्तीसंदर्भात सातत्याने निवेदन देऊनही त्याकडे लक्ष नसल्याने अलिबाग तालुक्यातील जनता आता संतप्त झाली आहे. २९ एप्रिल रोजी अलिबाग-रेवस व कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड या मार्गावर असलेल्या आरसीएफ गेट वायशेत येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मिनीडोर चालक मालक कल्याणकारी संस्थेने अलिबाग येथील अधिकाऱ्यांना दिले. या आंदोलनाचे नेतृत्व मिनीडोर चालक मालक कल्याणकारी संस्था अलिबागचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर हे करणार आहेत.अलिबागला जोडणाऱ्या चारपैकी तीन मुख्य रस्त्यांची धूळधाण झाली आहे. सगळीकडे फक्त खड्डे आणि खड्डेच पडलेले आहेत. गेल्या पावसाळ्यातले ते दिवस आठवून अजूनही प्रवाशांच्या पोटात गोळा येतो. पावसाळा जवळ येतो आहे, तशी लोकांची अस्वस्थता वाढत आहे. रस्त्यांबाबत बोलायला कोणीही तयार नाही. यामुळे जनता संतप्त झाली असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे येत्या २९ एप्रिल रोजी जनता रस्त्यावर उतरण्याच्या बेतात आहे. अशा आशयाचे निवेदन मंगळवारी मिनीडोर संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. मात्र त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जागेवर नव्हते.अलिबाग-रोहा रस्ता, अलिबाग-रेवदंडा रस्ता, अलिबाग-रेवस रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. मिनीडोर, रिक्षा,एसटी प्रवास म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवासकरण्या सारखे आहे. दुचाकीस्वारांना तर जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागतो आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीस अपघात झाल्याचा घटना घडल्या आहे. विशेषत: महिलांना अपघात झाले आहेत. मात्र प्रशासनाला जाग येत नाही,अशी खंतही व्यक्त केली जात आहे.अधिकारी आणि राजकारणी ठेकेदार यांच्यात सामान्य जनतेचे मात्र हाल सुरू आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींना काही देणे-घेणे नसल्याचे समोर येत आहे. रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता हे रायगडात असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे या पावसापूर्वी तरी आपले रस्ते नीट होतील ना? याबाबत जनता साशंक आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर रस्ते चांगले होतील असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मात्र हा पावसाळा आला तरी अजून परिस्थिती तशीच आहे. (प्रतिनिधी)