शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग नगरपरिषदेची नवीन इमारत अनधिकृत?

By admin | Updated: April 25, 2017 01:22 IST

अलिबाग नगरपरिषदेवर सध्या शेकापची एक हाती सत्ता आहे. सतराच्या सतरा जागा या शेकापने जिंकून काँग्रेस, शिवसेना,

अलिबाग : नगरपरिषदेची नवीन इमारतच अनधिकृत असल्याचा दावा आप पार्टीच्या अलिबाग युनिटने केला आहे. या इमारतीच्या बांधकामाच्या वैधतेबाबत चौकशी व्हावी या मागणीसाठी सोमवारी आपच्या वतीने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. या उपोषणास काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती अ‍ॅड.अजय उपाध्ये यांनी दिली.काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा अ‍ॅड.श्रध्दा ठाकूर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष गजानन टिके, समीर ठाकूर, मच्छिंद्र पाटील, जगन्नाथ पाटील, प्रभाकर राणे, श्याम घरत, संजय सावंत, अ‍ॅड. अरुण सावंत, अ‍ॅड. महेश म्हात्रे, अ‍ॅड.गोपीनाथ डंगर, अ‍ॅड.श्रीराम ठोसर, समाजवादी पार्टीचे अश्रफ घट्टे, मंगलेश महेता यांनी भेट देवून उपोषणास पाठिंबा दिला. अ‍ॅड.श्रध्दा ठाकूर यांनी यावेळी अजय उपाध्ये यांना महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झालेले कागदपत्र पहाता अलिबाग नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसाठी सीआरझेड क्लिअरन्स घेतला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. याबाबत उपाध्ये यांनी वारंवार नगरपालिकेकडे पत्रव्यवहार करून त्यांना माहिती दिली जात नाही. हे बरोबर नसल्याचे सांगितले. यामध्ये जे काही सत्य असेल ते नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जनतेच्या माहितीसाठी प्रसिध्द केले पाहिजे असे मत व्यक्त केले. या वेळी अ‍ॅड.अजय उपाध्ये यांच्यासमवेत मनोज घरत अन्य उपोषणकर्ते उपस्थित होते.नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसाठी लाखो खर्च च्अलिबाग नगरपरिषदेची जुनी इमारत शहरातील लेले चौकामध्ये आहे. याच इमारतीमधून अलिबाग नगरपरिषदेचे प्रशासकीय कामकाज केले जात होते. च्कालांतराने अलिबाग शहराची लोकसंख्या, नागरीकरण वाढल्याने या इमारतीमधील जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे अलिबाग नगरपरिषदेला नवीन वास्तू असावी असा प्रवाह पुढे आला होता. त्या अनुषंगाने शेतकरी भवनसमोरील जागेमध्ये अलिबाग नगरपरिषदेने लाखो रु पये खर्च करून भव्य वास्तू उभारली आहे. याच इमारतीमधून सध्या अलिबाग नगरपषिदेचा प्रशासकीय कारभार होतो. या इमारतीला लोकनेते अ‍ॅड.दत्ता पाटील असे नुकतेच नाव देण्यात आले आहे. हीच इमारत उभारताना सीआरझेडची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे माहितीच्या अधिकारात उपाध्ये यांच्या समोर आले. या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

अलिबाग नगरपरिषदेवर सध्या शेकापची एक हाती सत्ता आहे. सतराच्या सतरा जागा या शेकापने जिंकून काँग्रेस, शिवसेना, आप यांना चांगलाच हादरा बसला होता. नगरपरिषदेने इमारत बांधून तिचा वापर सुरू करून बराच कालावधी गेला असताना आताच का जाग आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.