शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस किल्ले दत्तक द्या, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 19:37 IST

मुंबईत बसून टीकाटिप्पणी नको; एक पैसाही नको, तो आम्ही उभा करू..

अलिबाग-कोल्हापूर : सरकारला हात जोडून विनंती करतो, राज्यातील २५ किल्ले दत्तक द्या. हा शिवाजी महाराजांचा शिवभक्त वारसदार आपले वेगळेपण दाखवून देईल, असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महाेत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी ते बोलत होते. यासाठी एक पैसाही देऊ नका. ते आम्ही उभे करू. अशक्य ते शक्य करण्याची धमक या संभाजी छत्रपतीमध्ये आहे, असाही दावा त्यांनी केला.ते म्हणाले, राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा. सध्याच्या स्थितीत दहशतवाद वाढू लागला आहे, महिलांवर अन्याय होऊ लागले आहेत, जातीयवाद वाढत आहे. अशा परिस्थितीत अभ्यासक्रमामध्ये शिवरायांच्या गाथेचा समावेश झाला पाहिजे. या रायगडावर महाराजांना शोभणाऱ्याच गोष्टी राहतील. जिल्हा प्रशासन आणि शिवभक्तांचे आभार मानत असताना संभाजीराजे यांनी आपण पुढच्यावर्षी तुमच्यासोबत तंबूत राहणार असल्याचे सांगितले.

राजसदरेचे पुरावे उपलब्ध..छत्रपती शिवाजी महाराज राजसदरेच्या पाठीमागील बाजूस राहत होते. याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे पुरातत्व खात्याने आता आम्हांला राजसदरेचे राजवैभव पुन्हा उभारण्यासाठी परवानगी द्यावी.

शिवरायांविषयी अनुदगार, निर्णय घ्याकोणी भाषणातून, कोणी नाटकातून शिवाजी महाराजांविषयी अनुद्गार काढतो. परंतु, हे बंद झाले पाहिजे. यांना शिस्त नको का लावायला. कोणी काही बोलले तर एक पक्ष त्याची बाजू घेतो. म्हणून दुसरा दुसरी बाजू घेतो, हे चालणार नाही. शासनाने एक समिती करावी. स्मारक ग्रंथ करावा जाे सर्वांसाठी बंधनकारक राहील, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

मुंबईत बसून टीकाटिप्पणी नकोकाहीजण मुंबईत मला टार्गेट करीत आहेत. माझ्यावर टीकाटिप्पणी करीत आहेत. त्यांनी रायगडावर येऊन पाहावं. माझ्यासोबत दोन दिवस राहून काम बघावं. हे काही पुलाचे आणि डांबरी रस्त्याचे काम नाही. हे किल्ले संवर्धनाचे काम आहे, असा टोलाही संभाजीराजे यांनी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaigadरायगडShivrajyabhishekशिवराज्याभिषेकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीFortगडGovernmentसरकार