अमृतांजन पुलाजवळ दुधाच्या टँकरला अपघात; चालक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 17:52 IST2018-10-09T17:48:49+5:302018-10-09T17:52:49+5:30
चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टँकरची पुलाच्या खांबाला धडक

अमृतांजन पुलाजवळ दुधाच्या टँकरला अपघात; चालक ठार
खोपोली: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास दुधाच्या टँकरला अपघात झाला. टँकर पुण्याहून मुंबईकडे जाताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. बोरघाटातील अमृतांजन पुलाच्या खांबाला टँकरनं धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, संपूर्ण टँकरचा चक्काचूर झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. सध्या बोरघाटातील वाहतूक थांबवून अपघातग्रस्त टँकर बाजूला काढण्यात येत आहे. सध्या खोपोली पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.