परतीचा प्रवास करणाऱ्या भक्तांच्या गाडीला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 12:54 IST2022-09-09T12:53:38+5:302022-09-09T12:54:04+5:30

कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करताना प्रवाशांना अपघात झाला आहे. ट्रॅव्हलर खेडवरून मुंबईतील सांताक्रूझकडे येत होती.

Accident in the car of devotees traveling back | परतीचा प्रवास करणाऱ्या भक्तांच्या गाडीला अपघात

परतीचा प्रवास करणाऱ्या भक्तांच्या गाडीला अपघात

वडखळ : परतीचा प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला मुंबई - गोवा महामार्गावर अपघात झाला. यात १४ प्रवासी जखमी झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर  हमरापूर फाटा येथील ब्रिजवर रात्री दोनच्या सुमारास ट्रॅव्हलर आणि ट्रेलरमध्ये अपघात  झाला. यात ट्रॅव्हलरमधील एकूण २२ प्रवाशांपैकी १४ जण जखमी झाले.

कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करताना प्रवाशांना अपघात झाला आहे. ट्रॅव्हलर खेडवरून मुंबईतील सांताक्रूझकडे येत होती. मात्र, पेण जवळील हमरापूर ब्रीजवर बंद पडलेल्या कॉईल ट्रेलरला  मागून धडक दिल्याने अपघात झाला. चालक सागर  गुरव (३१), प्रतिभा देवळे (३०), रंजना भुवड (२५), मीनल देवळे (२५), काशिनाथ  देवळे (५०), सुरेश नाचरे (४०), प्रवीण नाचरे (३४), मंगेश देवळे (४१), स्वप्निला  देवळे (४७), संजना पाटील (३४), समृद्धी  पाटील (१४), दीपक भुवड (३०), श्वेता भुवड (३५), संजना नाचरे (३५), या अपघातग्रस्तांना सामाजिक कार्यकर्ते कल्पेश ठाकूर यांनी रुग्णवाहिकेतून तत्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
 

Web Title: Accident in the car of devotees traveling back