शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

रायगडमध्ये यंदा ८,४०४ शाईच्या बाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:23 IST

भारतीय लोकशाहीत श्रीमंत असो वा गरीब, शिक्षित असो वा अशिक्षित, स्त्री असो वा पुरुष त्यास एकाच मताचा अधिकार आहे.

- जयंत धुळप अलिबाग : भारतीय लोकशाहीत श्रीमंत असो वा गरीब, शिक्षित असो वा अशिक्षित, स्त्री असो वा पुरुष त्यास एकाच मताचा अधिकार आहे. आणि निवडणुकीत एकदा मतदान केल्यावर त्यास पुन्हा मतदान करता येऊ नये वा त्याने पुन्हा मतदान करू नये, यासाठी मतदाराने मतदान केल्यावर त्याच्या उजव्या हाताच्या आंगठ्यापासूनच्या दुसऱ्या बोटाला नखाच्या बाजूला शाई लावून त्याने मतदान केल्याची खूण करण्याची पद्धत आहे. १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ही पद्धत अमलात आली आणि त्यास यंदा ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. ही खूण करण्याची शाई म्हसूर येथे तयार होते म्हणून या शाईला म्हैसुरी शाई असेदेखील संबोधले जाते.रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड आणि कर्जत या सात विधानसभा मतदारसंघात येत्या २३ एप्रिल २०१९ रोजी होणाºया लोकसभा निवडणुकीतील मतदानाकरिता रायगड जिल्ह्यातील एकूण २२ लाख २५९ मतदारांच्या बोटाला मतदानानंतर शाईने खूण करण्याकरिता एकूण ८ हजार ४०४ शाईच्या बाटल्या वापरण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक साधनसामग्री समितीचे प्रमुख तथा तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.।शाईचा पूर्वइतिहास...‘इंडेलिबल इंक’ म्हणून ओळखल्या जाणाºया या शाईचा मतदान प्रक्रियेत सर्वप्रथम भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी केला.या शाईची निर्मिती दक्षिण भारतातल्या म्हैसूर येथील ‘पेंट अ‍ॅण्ड वार्निश लिमिटेड’ या कंपनीकडून करण्यात येते.सन १९३७ मध्ये या कंपनीची स्थापना तत्कालीन म्हैसूर प्रांताचे महाराज नलवाडी कृष्णराजा वाडियार यांनी केली.ही शाई खुल्या बाजारात उपलब्ध नाही. ती केवळ विविध सरकारे आणि निवडणुकीत सहभागी झालेल्या संस्थांनाच विकली जाते. देशातही निर्यात केली जाते.।शाई ४० सेकंदात सुकते आणि ७२ तास टिकून राहतेसिल्व्हर नायट्रेट या रसायनाचा वापर करून करण्यात येणाºया या शाईचा पाण्याशी संपर्क आला तरी ती पुसली जात नाही. बोटाच्या पेशी जशा जुन्या होत जातात तशी ही शाई निघून जाते. बोटावर लावल्यावर ही शाई केवळ ४० सेकंदात सुकते आणि किमान ७२ तास टिकून राहते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड