शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा तालुक्यात ४६६ दाखलपात्र विद्यार्थी

By admin | Updated: April 25, 2017 01:13 IST

सर्व शिक्षा अभियानअंतर्गत म्हसळा तालुक्यातील ६ ते १४ वयोगटातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी दाखलपात्र

म्हसळा : सर्व शिक्षा अभियानअंतर्गत म्हसळा तालुक्यातील ६ ते १४ वयोगटातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी दाखलपात्र विद्यार्थ्यांचा सर्व्हे झाला. त्यामध्ये एकूण ४६६ दाखलपात्र विद्यार्थी आढळून आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४, १५ एप्रिल रोजी तालुक्यातील ३२८ विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी शाळेत दाखल केले आहे. शिल्लक राहिलेली मुलेही लवकरच शाळेत दाखल होतील, असा विश्वास म्हसळा प्राथमिक शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.म्हसळा तालुक्यात ८४ महसुली गावांपैकी तालुका शहर नगरपंचायत व ३९ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात शैक्षणिक सेवा सुविधा देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण ११० प्राथमिक शाळा आहेत, याकरिता ११ केंद्रे कार्यरत आहेत. केंद्रनिहाय दाखलपात्र ४६६ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. यापैकी १४ व १५ एप्रिल रोजी ३२८ विद्यार्थी दाखल झाल्याचे गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे यांनी सांगितले. तसेच ४ मुले व २ मुलींना दाखलपात्र व्यतिरिक्त जादा दाखल अशी नोंद करण्यात आली आहे. दाखलपात्र विद्यार्थी संख्येत उन्हाळी सुटीनंतर वाढ होईल, असा विश्वास गट शिक्षण अधिकारी साळुंखे यांनी व्यक्त के ला. जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू शाळांमध्ये आता दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचे सांगून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळांत दाखल करण्याचे आवाहन साळुंखे यांनी केले. दाखलपात्र विद्यार्थी नोंद ही तालुक्यात कार्यरत ९७ अंगणवाडी आणि ३१ मिनी अंगणवाडीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींची आहे. (वार्ताहर)