शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते स्वच्छ करणारी ४० लाखांची मशीन धूळखात; कर्जत नगरपरिषेदचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 01:09 IST

कुशल कामगार नसल्याने येत आहेत अडचणी

कर्जत : कर्जत नगर परिषद हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रिटचे रस्ते आहेत. त्या रस्त्यांवर माती, धूळ स्वच्छ करण्यासाठी ४० लाख खर्चून कर्जत नगर परिषदने स्विपिंग मशीन खरेदी केली आहे. पालिकेचे प्रमुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्याकडून ही गाडी चालविण्यासाठी एक्स्पर्ट कामगारांची नियुक्ती झाली नाही. परिणामी संबंधित गाडी पाच महिने पालिकेच्या आवारात धूळखात पडली आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत ही क वर्ग नगर परिषद मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत येते. त्यामुळे कर्जत शहरातील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करोडो रुपयांचा निधी प्राप्त होत असतो. त्या निधीमधून कर्जत शहरातील बहुतेक रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनविले गेले आहेत. नागरिकांना या रस्त्यावरील धुळीचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे अनेकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे स्विपिंग मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव पालिकेत आणला गेला. ऑगस्ट २०२० मध्ये ही गाडी आणण्यात आली. त्यानंतर केवळ फेरफटका मारण्यासाठी ही स्विपिंग गाडी पालिकेच्या समोरच्या रस्त्यावर काढली जाते आणि पुन्हा पालिकेच्या आवारात उभी केली जाते. त्यामुळे ४० लाख खर्चून आणण्यात आलेली ही मशीन कर्जत शहरातील नागरिकांना देखावा दाखवण्यासाठी आणण्यात आली आहे काय? असा प्रश्न आहे.

याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांना संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. तर आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे यांना संपर्क केला असता पालिकेने स्विपिंग मशीन चालविण्यासाठी एक्स्पर्ट कामगार नव्याने भरला जाणार नाही, तर आपल्याकडे असलेल्या कामगाराला ही मशीन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती दिली. मात्र, गेल्या सहा महिन्यांत ही मशीन चालविण्याचे प्रशिक्षण का दिले नाही? याबाबत त्यांनी काही सांगितले नाही.

तांत्रिक दोषही आढळलेही मशीन खरेदी करताना कामगार वर्गासाठी जाहिरात काढणे आवश्यक होते. मात्र, निवड प्रक्रिया राबविली गेली नाही. त्यामुळे परदेशी बनावटीची ती मशीन पावसाळा संपल्यानंतर स्थानिक कामगारांनी रस्त्यावर बाहेर काढली. त्यावेळी स्विपिंगमध्ये काही तांत्रिक दोष आढळले आणि त्याची दुरुस्ती पालिकेला करावी लागली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी अद्याप गाडीची माहिती असलेला एक्स्पर्ट टेक्निशियन ची नियुक्ती केलेली नाही.