शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

३१ शिक्षकांचा अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे, ४१ शिक्षकांचे समायोजन आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 2:33 AM

रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या ७३ जागा रिक्त होत्या. त्या जागांसाठी १२१पैकी ४१ शिक्षकांचे समायोजन नुकतेच आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या ७३ जागा रिक्त होत्या. त्या जागांसाठी १२१पैकी ४१ शिक्षकांचे समायोजन नुकतेच आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले. त्यामध्ये ४० मराठी आणि एका उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा समावेश आहे. उर्वरित ३१ अतिरिक्त ठरलेले शिक्षक हे निकषामध्ये बसत नसल्याने त्यांच्या समायोजनाबाबतचा अहवाल शिक्षण उपसंचालक यांना पाठवण्यात आला आहे. त्यामुळे ३१ शिक्षकांना राज्यातील कोणत्याही शाळेत आता नोकरीसाठी जावे लागणार आहे.शिक्षकांचे समायोजन करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची ओरड आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत होती. त्यामुळे वशिला असणाºया शिक्षकांना पाहिजे तेथे नोकरीसाठी जाता येत होते. त्याचप्रमाणे अतिरिक्त ठरणारे शिक्षक हे काही सरकारी अधिकाºयांना मलिदा देऊन समायोजन करीत होते. त्यामुळे ज्येष्ठता आणि गुणवत्ता यांना तीलांजली दिली जात होती. कालांतराने अशी प्रकरणे बाहेर येऊ लागल्याने सरकारची बदनामी होत होती. यावर उपाययोजना म्हणून सरकारने आॅनलाइन पद्धतीने समायोजन करण्याचा आमूलाग्र बदल अमलात आणला. त्यामुळे सरळ होणाºया भ्रष्टाचाराला काही अंशी लगाम बसण्यास मदत झाल्याचा दावा सरकारी अधिकाºयांनीच केला.रायगड जिल्ह्यामध्ये माध्यमिकच्या ३०२ शाळा आहेत. सुमारे एक लाख पाच हजार विद्यार्थी संख्या आहे. साडेतीन हजारांच्या आसपास शिक्षक आहेत. २०१६मध्ये समायोजन करण्यात आले होत. त्या वेळी १७५ शिक्षक हे अतिरिक्त ठरले होते. २०१७ मध्ये झालेल्या समायोजनात ३१ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या ७३ जागा रिक्त होत्या. मराठी माध्यमाच्या ११८ शिक्षकांपैकी ४० शिक्षकांचे समायोजन आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले, तर तीन उर्दू माध्यमाच्या शिक्षकांपैकी एकाच शिक्षकाचे समायोजन आॅनलाइन पद्धतीने झाले. अशा एकूण ४१ शिक्षकांचा त्यामध्ये समावेश होता. म्हणजेच रिक्त असणाºया ७३ जागांपैकी ४१ शिक्षकांचे समायोजन झाल्याने अद्यापही ३१ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.कॅटॅगरी, विषय शिक्षक यासह अन्य निकषामध्ये हे ३१ शिक्षक बसत नसल्याने त्यांचे समायोजन होऊ शकले नाही. त्यांच्या समायोजनाचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने सांगितले.>आहे त्या शाळेतच काम करता येण्याची शक्यतागेल्या वर्षी १७५ पैकी ५२ शिक्षकांच्या समायोजनाचा प्रस्ताव माध्यमिक विभागाने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठविला होता.मात्र, त्यांच्याकडून समायोजनाची प्रक्रिया न झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या ५२ शिक्षकांना आहे त्याच शाळेमध्ये समाविष्ट केले होते.त्यामुळे या वर्षी ३१ अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या बाबतीत तसे झाले, तर आहे त्याच शाळेत काम करता येण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलले जाते.>३१ अतिरिक्त ठरणाºया शिक्षकांचे समायोजन आता शिक्षण उपसंचालक करणार आहेत. त्यामुळे ३१ अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना निकष न डावलता राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शाळेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना राज्यातील कोणत्याही शाळेत जाण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचे बोलले जाते.>२०१६मध्ये समायोजन करण्यात आले होते. त्या वेळी १७५ शिक्षक हे अतिरिक्त ठरले होते. २०१७ मध्ये झालेल्या समायोजनात ३१ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.

टॅग्स :RaigadरायगडTeacherशिक्षक