ZP President Election: जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत खळबळ; दौंडमधून लॉबिंग, सुनेत्रा पवारांवर दबावाचा प्रयत्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:16 IST2026-03-17T11:15:55+5:302026-03-17T11:16:20+5:30

- बँक बैठकीत अध्यक्षपदावरच चर्चा; थोरातांच्या हालचालींमुळे पक्षात नाराजी

ZP President Election pune Excitement in NCP over Zilla Parishad president post; Lobbying from Daund, attempt to pressure Sunetra Pawar? | ZP President Election: जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत खळबळ; दौंडमधून लॉबिंग, सुनेत्रा पवारांवर दबावाचा प्रयत्न?

ZP President Election: जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत खळबळ; दौंडमधून लॉबिंग, सुनेत्रा पवारांवर दबावाचा प्रयत्न?

पुणे : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी (अजित पवार)मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदासाठी दौंडमधून मोठ्या प्रमाणात फिल्डींग लावली जात असल्याची चर्चा असून, माजी आमदार रमेश थोरात यांच्या हालचालींमुळे पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी जिल्हा बँकेच्या काही संचालकांनी बँकेच्या कामकाजासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीत मुख्य विषय बाजूला पडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरच चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अध्यक्षपदाच्या निवडीचे सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले असताना, काही जण त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार)ने दमदार कामगिरी करत जिल्हा परिषदेत ५१ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. तसेच, १३ पैकी ७ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीतही १० पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. जुन्नरमध्ये शिंदेसेना, खेडमध्ये उद्धवसेना, तर दौंडमध्ये भाजपने आपला गड राखला असला, तरी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांनी सुरुवातीपासूनच लॉबिंग सुरू केले होते. मात्र, नंतर सर्व वरिष्ठ नेत्यांनी अध्यक्षपदाच्या निवडीचे अधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवले. स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर अंतिम निर्णय त्या घेतील, असेही स्पष्ट करण्यात आले होते. यापूर्वी अध्यक्षपदासाठी दौंडमधील वीरधवल जगदाळे, तसेच बारामतीतील करण खलाटे यांची नावे चर्चेत होती. त्याचबरोबर माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात यांचेही नाव पुढे आले होते.

गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षपदासाठी दोनच नावांची चर्चा सुरू असताना, रमेश थोरात यांनी जिल्हा बँकेच्या संचालकांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे अनेक संचालक नाराज झाले होते. काहींना तर, स्वाक्षऱ्या नेमक्या कशासाठी घेतल्या हेही माहिती नव्हते. त्यानंतर रविवारी बँकेच्या कामकाजासंदर्भात सुनेत्रा पवार यांच्याबरोबर झालेल्या भेटीमध्ये अध्यक्षपदाचा विषय उपस्थित झाल्याने उपस्थित संचालकही अस्वस्थ झाल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडीनंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून नाराजी व्यक्त होत असून, “निवडीचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देऊन नंतर त्यांच्यावर दबाव टाकणे सुसंस्कृत राजकारणाला शोभणारे नाही,” असे मत एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. 

....तर शिंदेसेनेचे दरवाजे खुले?

माजी आमदार रमेश थोरात यांनी आपल्या मुलाला अध्यक्षपद मिळावे, यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. जिल्हा बँकेतील काही संचालकांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर दबाव तंत्राचा वापर केल्याचीही चर्चा रंगली आहे. अध्यक्षपद मिळाले नाही, तर शिंदेसेनेचे दरवाजे खुले असल्याचा इशाराही दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. 

निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

दौंड नगर परिषद, तसेच जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी (अजित पवार)चे निवडून आले आहेत. त्यामुळे या भागातील भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करून अध्यक्षपदाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यवत, राहू, केडगाव, पाटस, भांडगाव या पट्ट्यात रमेश थोरात यांचे वर्चस्व असले, तरी त्यांच्या बदलत्या भूमिकांमुळे काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते. दरम्यान अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे वीरधवल जगदाळे हे अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असून, सुनेत्रा पवार यांच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : ZP अध्यक्ष चुनाव पर राकांपा में खलबली; सुनेत्रा पवार पर दबाव?

Web Summary : पुणे ZP अध्यक्ष चुनाव को लेकर राकांपा में आंतरिक कलह। दौंड से लॉबिंग से तनाव, सुनेत्रा पवार पर दबाव। सबकी निगाहें उनके फैसले पर।

Web Title : Turmoil in NCP over ZP President Election; Pressure on Sunetra Pawar?

Web Summary : NCP faces internal strife over Pune ZP president election. Lobbying from Daund creates tension, pressuring Sunetra Pawar. All eyes on her decision.