तरुणीला बघून उघडली पॅन्टची झीप; पुण्यात डिलिव्हरी बॉयचे अश्लील कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 15:50 IST2021-12-07T15:42:29+5:302021-12-07T15:50:58+5:30

पुणे : ऑनलाईन ऑर्डर केलेल्या लॅपटॉप बॅगची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याने तरुणीसमोर अश्लिल कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उंड्री परिसरात ...

zip of pants opened delivery boy obscene act pune crime | तरुणीला बघून उघडली पॅन्टची झीप; पुण्यात डिलिव्हरी बॉयचे अश्लील कृत्य

तरुणीला बघून उघडली पॅन्टची झीप; पुण्यात डिलिव्हरी बॉयचे अश्लील कृत्य

पुणे : ऑनलाईन ऑर्डर केलेल्या लॅपटॉप बॅगची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याने तरुणीसमोर अश्लिल कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उंड्री परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सतीश केंधले नावाच्या कर्मचाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत उंड्री येथे राहणाऱ्या २३ वर्षांच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ डिसेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडला आहे.

फिर्यादी तरुणीने एका ऑनलाईन संकेतस्थळावरून लॅपटॉप बॅग ऑर्डर केली होती. ती ऑर्डर घेऊन आरोपी तरुणीकडे आला होता. यावेळी आरोपीने स्वतःच्या पॅन्टची चेन काढून तरुणीच्यासमोरच अश्लिल कृत्य केले. हा प्रकार तरुणीने आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने फोनद्वारे आरोपीला जाब विचारला. त्यावेळी त्याने मी कोणाला घाबरत नाही, काय करायचे ते करा, असे बोलून त्यांनादेखील धमकी दिली. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे.

Web Title: zip of pants opened delivery boy obscene act pune crime