शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील ५ वी ते ८वीपर्यंतच्या शाळा बुधवारपासून (दि. २७) सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील ५ वी ते ८वीपर्यंतच्या शाळा बुधवारपासून (दि. २७) सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहे. या शाळा कोरोना सुरक्षितता उपाययोजनानंतरच सुरू करण्यात याव्या तसेच शिक्षकांच्या आटीपीआर चाचण्या कराव्या, अशा सूचना जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.

जिल्ह्यातील यापूर्वी ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आता जिल्हा परिषदेच्या ५ वी ते ८ वीच्या शाळा बुधवारपासून सुरू होणार आहे. ५ वी ते ८वीच्या जिल्ह्यात २ हजार २६८ शाळा आहेत. या शाळांवर जवळपास १० हजार ९९९ शिक्षक कार्यरत आहेत. तर ३ लाख ७० हजार ५०५ विद्यार्थी संख्या आहे. या शाळा सुरू

करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेऊन पालकांच्या परवानगीने शाळा सुरू केल्या जाव्यात, अशा सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शाळा परिसराचे निर्जंतुकीकरण सुरू आहे. शिक्षकांच्या आटीपीसीआर चाचण्याच्या सुचना दिल्या असून ज्याचे अहवाल निगेटीव्ह येतील अशा शिक्षकानांच शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटर स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर तसेच सुरक्षित वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. एखाद्या शाळेत विलगीकरण कक्ष असल्यास ते इतरत्र हलवावे आणि इमारतीचा ताबा शाळेला देण्यापूर्वी त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व तयारी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर राखण्याच्या काटेकोर सूचना देण्यात आल्या आहेत. बैठक व्यवस्थेत योग्य अंतर राखण्यात यावे. तसेच तशी व्यवस्था नसल्यास मोकळ्या जागेत शाळा भरवण्यात यावे. एका बाकावर एक विद्यार्थ्याला बसवण्यात यावे. तसेच शाळेच्या दर्शनी भागात मार्गदर्शक सूचना लावण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

चौकट

विद्यार्थ्यांना मास्क लावणे बंधनकारक आहे, शाळा परिसरात उभे राहताना सहा फुटांचे अंतर ठेवावे, शाळा परिसरात थुंकण्यास बंदी, गर्दी होण्याच्या ठिकाणी उदाहरणार्थ पाणी पिण्याचे ठिकाण, स्वच्छतागृह आदी ठिकाणी अंतर राखण्यासाठी वर्तुळ आखण्यात आले आहेत.

चौकट

पाचवी ते आठवी पर्यंत शाळा शिक्षकांची संख्या विद्यार्थ्यांची संख्या

२२६८ १०९९९ ३७०५०५