ZP Election 2026 : वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर, मतदान वाढल्याने उमेदवारांची उत्सुकता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 18:40 IST2026-02-08T18:39:42+5:302026-02-08T18:40:08+5:30

राजगड तालुक्यात ७९.३० टक्के मतदान झाले आहे आणि वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात जाणार आहे याची उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे

Zilla Parishad Election Whose path is the increased voter turnout on? Candidates are curious as voting increases | ZP Election 2026 : वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर, मतदान वाढल्याने उमेदवारांची उत्सुकता 

ZP Election 2026 : वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर, मतदान वाढल्याने उमेदवारांची उत्सुकता 

राजगड : राजगड तालुक्यात ७९.३० टक्के मतदान झाले आहे आणि वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात जाणार आहे याची उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे. वेल्हे खुर्द गटात एकूण १००११महिलांनी आणि ११८०२ पुरुषांनी मतदान केले आहे, असे एकूण २१८१३ लोकांनी मतदान केले आहे. या गटात राष्ट्रवादीकडून तानाजी मांगडे, भाजपकडून शिवाजी चोरगे आणि उद्धवसेनेकडून शैलेश वालगुडे यांच्यामध्ये लढत झाली आहे.

विझर गटात एकूण १०२०३ महिलांनी आणि ११७७२ पुरुषांनी मतदान केले आहे, असे एकूण २१९७६ लोकांनी मतदान केले आहे. राष्ट्रवादीकडून अमोल नलावडे, भाजपकडून शिवराज शेंडकर, शिंदेसेनेकडून अनंता रेवणनाथ दारवटकर यांच्यामध्ये लढत झाली आहे. दोन्ही गटांमध्ये चुरशीच्या लढती झाल्या आहेत. उमेदवारांनी मतदारांसाठी विविध सुविधांमुळे मतदान वाढल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. आमदार शंकर मांडेकर यांनी दोन्ही जिल्हा परिषद गटात सभा घेतल्या, अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे दोन ते तीन दिवस सर्व प्रचार रखडला होता. त्यामुळे याबाबत पक्षातील उमेदवाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याची चर्चा तालुक्यात होती. दोन्ही गटात भाजपकडून पहिलेच तयारी केलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली होती, त्यांनी आधीच गटातील सर्व गावे फिरून काढली होती. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसमधील सर्व कार्यकर्ते भाजपमध्ये गेले, त्यामुळे उमेदवारांना निवडणूक तयारी सुरू करावी लागली. त्यामुळे तालुक्यातील सर्वच उमेदवारांनी मतदान वाढावे म्हणून शहरातील उमेदवारांना भेटून मतदानासाठी प्रोत्साहित केले होते. मतदानात युवकांचा सहभाग वाढला आहे. राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्याने ऐन वेळी दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळविली, त्यामुळे बंडखोरीचा फायदा कोणाला होईल याची चर्चा सध्या रंगली आहे.

वांगणी गणात सहाजण रिंगणात असल्याने या गणात मतांचे विभाजन होणार आहे. वेल्हे गणात सरपंच सीता खुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून, भाजपकडून निकिता पवार आणि अपक्ष म्हणून सुवर्णा राजीवडे रिंगणात होत्या, त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळाली आहे. विझर गणात सर्वाधिक चुरस होती. माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांनी त्यांच्या बंधू अंकुश दसवडकर यांच्या करून राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवून त्यांच्यासाठी तगडं आव्हान निर्माण केलं होतं. त्यामुळे या गणात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी चुरस झाली. वेल्हे गणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तालुका अध्यक्ष किरण राऊत यांच्या पत्नी सुवर्णा राऊत, भाजपकडून माजी सभापती सीमा राऊत, शिवसेना शिंदे गटाकडून स्नेहल ढेबे सरळ रिंगणात होत्या. या गटात भाजप विरुद्ध लढत झाली. दोन्ही गटामध्ये वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात जाणार आहे, याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Web Title : ZP चुनाव 2026: बढ़े हुए मतदान से राजगढ़ में उम्मीदवारों की उत्सुकता बढ़ी।

Web Summary : राजगढ़ के ZP चुनाव में 79.30% मतदान हुआ, जिससे उम्मीदवारों में उत्सुकता है। प्रमुख मुकाबले में मांगडे बनाम चोरगे बनाम वालगुडे शामिल हैं। बढ़े हुए मतदान से सवाल उठता है कि मतदाता मतदान से किसे लाभ होता है। उम्मीदवार रणनीतियों और पार्टी की गतिशीलता ने चुनाव की प्रतिस्पर्धा को प्रभावित किया।

Web Title : ZP Election 2026: Increased voter turnout sparks candidate anticipation in Rajgad.

Web Summary : Rajgad's ZP election saw 79.30% turnout, fueling candidate curiosity. Key contests include Mangade vs. Chorge vs. Walgude. Increased voting raises questions about who benefits from voter turnout. Candidate strategies and party dynamics influenced the election's competitiveness.