Zilla Parishad Election: राजकीय समीकरणे बदलली; आंबेगावात चार पक्षांची युती, भाजप-काँग्रेस स्वतंत्र मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:10 IST2026-01-22T14:09:39+5:302026-01-22T14:10:16+5:30

आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे २७, तर पंचायत समितीचे ५८ अर्ज दाखल

Zilla Parishad Election: Political equations changed; Four parties form alliance in Ambegaon, BJP-Congress in separate fray | Zilla Parishad Election: राजकीय समीकरणे बदलली; आंबेगावात चार पक्षांची युती, भाजप-काँग्रेस स्वतंत्र मैदानात

Zilla Parishad Election: राजकीय समीकरणे बदलली; आंबेगावात चार पक्षांची युती, भाजप-काँग्रेस स्वतंत्र मैदानात

घोडेगाव : आंबेगाव तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकमध्ये आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी २७ अर्ज तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी ५८ असे ८५ अर्ज दाखल झाले. घोडेगाव येथील तहसील कार्यालयात अर्ज भरण्यासाठी उत्स्फूर्त गर्दी दिसली.

आंबेगाव तालुक्यात शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असे चार पक्ष एकत्र आल्याचे चित्र दिसले, तर भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, तसेच काँग्रेस आय पक्षाने देखील अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. मनसेने एकाही जागेवर अर्ज भरला नाही, तर अपक्ष व बंडखोर यांनी अनेक ठिकाणी अर्ज दाखल केले.

आंबेगाव तालुक्यात सर्वांत जास्त अर्ज बोरघार गणात आले. या गणात एका जागेसाठी ११ अर्ज दाखल झाले, तर पारगावतर्फे औषध बुद्रुक गटासाठी आठ अर्ज आले आहेत. आंबेगाव तालुक्यातील निवडणुकीचे चित्र पाहिले असता पारगाव गटातील निवडणूक ही चुरशीची होणार आहे. येथे विवेक वळसे पाटील व अरुण गिरे यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळेल.

 

Web Title : अंबेगांव जिला परिषद चुनाव: बदले राजनीतिक समीकरण, बहुदलीय गठबंधन

Web Summary : अंबेगांव जिला परिषद चुनाव में राजनीतिक समीकरण बदल गए हैं। चार दल एकजुट, भाजपा और कांग्रेस स्वतंत्र रूप से चुनाव लड़ रहे हैं। आवेदनों की उच्च संख्या प्रतिस्पर्धात्मक चुनाव का संकेत देती है, विशेषकर पारगाँव में।

Web Title : Ambegao Zilla Parishad Election: Political Equations Shift, Multi-Party Alliance Forms

Web Summary : Ambegao's Zilla Parishad election sees shifting alliances. Four parties unite, while BJP and Congress contest independently. High application numbers indicate a competitive election, especially in Pargaon.