Zilla Parishad Election : शिक्षक पात्रता परीक्षार्थी शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 09:52 IST2026-02-03T09:51:21+5:302026-02-03T09:52:09+5:30

राज्य निवडणूक आयोगाची मान्यता, जिल्ह्यातील साडेतीन हजार शिक्षकांना दिलासा 

Zilla Parishad Election news teachers who have passed the Teacher Eligibility Test are excluded from election work | Zilla Parishad Election : शिक्षक पात्रता परीक्षार्थी शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळले

Zilla Parishad Election : शिक्षक पात्रता परीक्षार्थी शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळले

पुणे : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेस बसणाऱ्या शिक्षकांना अखेर निवडणुकीच्या कामकाजातून वगळण्यात आले आहे. जिल्ह्यात असे सुमारे साडेतीन हजार शिक्षक असून या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नगरपरिषदेच्या निवडणुकीत तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना या कामासाठी आता नेमण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने या शिक्षकांना निवडणूक कामाची मुभा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे या परीक्षार्थी शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बहुतांश सर्वच विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात शिक्षकांचादेखील समावेश होता. मात्र, सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व बढतीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. ही परीक्षा ऐन पूर्वीच्या वेळापत्रकानुसार मतमोजणीच्या दिवशी तर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीला दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर मतमोजणीच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना निवडणुकीचे कामकाज द्यायचे की परीक्षा देण्यास मुभा द्यायची, असा संभ्रम जिल्हा प्रशासनापुढे निर्माण झाला होता. 

या संदर्भात सर्व बारा जिल्ह्यांमधून अहवाल मागविण्यात आला. त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या सर्व परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक कामकाजातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी नगरपरिषदेच्या निवडणुकीत कामकाज पाहिलेल्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जिल्ह्यात नेमण्यात आलेल्या सुमारे १९ हजार कर्मचाऱ्यांपैकी एकूण शिक्षकांची संख्या १६ हजार ४०३ इतकी आहे. त्यातील ३ हजार ४७४ शिक्षक या परीक्षेत बसले आहेत. या जागांवर अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांना कामकाजाची नियुक्ती देण्यात आली आहे.

परीक्षेस बसलेले तालुकानिहाय शिक्षक

जुन्नर २५४, आंबेगाव ३४०, शिरूर ३६३, खेड ४०५, मावळ २४०, मुळशी १६९, हवेली ४६३, दौंड २१०, पुरंदर १०३, राजगड १०४, भोर १५५, बारामती ३३०, इंदापूर ३३८ एकूण ३४७४.

Web Title : जिला परिषद चुनाव: शिक्षक पात्रता परीक्षा देने वाले शिक्षक चुनाव ड्यूटी से मुक्त

Web Summary : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा में बैठने वाले शिक्षकों को चुनाव ड्यूटी से छूट दी गई है। लगभग 3,500 शिक्षक प्रभावित हैं। नगर पालिका कर्मचारी उनकी जगह लेंगे, जिससे शिक्षकों को राहत मिलेगी।

Web Title : Teacher Eligibility Test Candidates Exempted from Zilla Parishad Election Duty

Web Summary : Teachers appearing for the Central Teacher Eligibility Test are exempted from election duty. Approximately 3,500 teachers are affected. Municipal council staff will replace them, providing relief to the teachers.