Zilla Parishad Election : मतदान, मतमोजणीचे काटेकोर नियोजन करा; राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांचे निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 09:35 IST2026-02-03T09:34:56+5:302026-02-03T09:35:11+5:30

वाघमारे यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे जिल्ह्याच्या तयारीचा सविस्तर आढावा सोमवारी घेतला.

Zilla Parishad Election Make strict planning for voting and counting; State Election Commission Commissioner's instructions | Zilla Parishad Election : मतदान, मतमोजणीचे काटेकोर नियोजन करा; राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांचे निर्देश 

Zilla Parishad Election : मतदान, मतमोजणीचे काटेकोर नियोजन करा; राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांचे निर्देश 

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतदान आणि मतमोजणीचे काटेकोर नियोजन करावे असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी (दि. २) दिले. या वेळी मतदान केंद्रांची संख्या, तेथील सुविधा, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तसेच दुबार मतदारांच्या मुद्द्यांवर त्यांनी माहिती घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी कायदा-सुव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि मनुष्यबळ नियोजनाबाबत सादरीकरण केले.

वाघमारे यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे जिल्ह्याच्या तयारीचा सविस्तर आढावा सोमवारी घेतला. यापूर्वी २८ जानेवारी रोजी पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांची विभागीय आयुक्त कार्यालयात प्रत्यक्ष बैठक होणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी ही आढावा बैठक ऑनलाइन घेण्यात आली.

बैठकीत निवडणूक आयुक्तांनी मनुष्यबळाची उपलब्धता, प्रशिक्षण स्थिती, आवश्यक व उपलब्ध मतदान यंत्रांची संख्या, झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती तसेच आचारसंहितेच्या कालावधीत घडलेल्या घटनांबाबत सविस्तर माहिती घेतली.

जिल्हाधिकारी डुडी यांनी जिल्ह्यातील मतदारसंख्या, मतदान केंद्रांची रचना व मतमोजणी नियोजनाची माहिती दिली. जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्रे असून २३ हजार ११४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले. सर्व मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्ह्यात १३ ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या असून तेथे चोवीस तास सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. मतदान जनजागृती मोहीम, तपासणी पथकांची नियुक्ती व प्राप्त तक्रारींवर केलेल्या कारवाईची माहितीही त्यांनी दिली.

Web Title : जिला परिषद चुनाव: मतदान, मतगणना की सतर्क योजना का निर्देश

Web Summary : राज्य चुनाव आयुक्त ने जिला परिषद चुनावों के लिए सतर्क योजना का निर्देश दिया। मतदान केंद्रों, आचार संहिता और मतदाता सूचियों की समीक्षा की गई। जिला अधिकारियों ने 7 फरवरी के चुनाव के लिए सुरक्षा और कर्मचारियों की योजना प्रस्तुत की।

Web Title : Zilla Parishad Election: Meticulous Planning for Voting, Counting Instructed

Web Summary : State Election Commissioner directed meticulous planning for Zilla Parishad elections. Details on polling booths, code of conduct, and voter lists were reviewed. District officials presented security and staffing plans for the February 7th election.