Zilla Parishad Election : दोन दिवसांत जिल्हा परिषदेसाठी पाच, पंचायत समितीसाठी ४ अर्ज दाखल; गटांसाठी ९४० तर गणांसाठी १२६५ अर्जांची विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 20:03 IST2026-01-17T20:03:42+5:302026-01-17T20:03:57+5:30

दोन दिवसांत जिल्हा परिषदेसाठी पाच, पंचायत समितीसाठी ४ अर्ज दाखल, गटांसाठी ९४० तर गणांसाठी १२६५ अर्जांची विक्री 

Zilla Parishad Election In two days, five applications were filed for Zilla Parishad, four for Panchayat Samiti, 940 for groups and 1265 for ganas were sold | Zilla Parishad Election : दोन दिवसांत जिल्हा परिषदेसाठी पाच, पंचायत समितीसाठी ४ अर्ज दाखल; गटांसाठी ९४० तर गणांसाठी १२६५ अर्जांची विक्री 

Zilla Parishad Election : दोन दिवसांत जिल्हा परिषदेसाठी पाच, पंचायत समितीसाठी ४ अर्ज दाखल; गटांसाठी ९४० तर गणांसाठी १२६५ अर्जांची विक्री 

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून गेल्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या गटांसाठी पाच अर्ज आले असून पंचायत समितीच्या गणांसाठी ४ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत ७३ गटांसाठी ९४० अर्जांची विक्री झाली असून १४६ गणांसाठी १ हजार २६५ अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली असून अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया शुक्रवारपासून (दि. १६) सुरू झाली. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी असून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. दरम्यान, १८ जानेवारी रोजी रविवार असल्याने त्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गेल्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी एकूण ९४० अर्जांची विक्री झाली आहे. त्यात शुक्रवारी ५३५ अर्जांची विक्री झाली व एक अर्ज प्राप्त झाला तर शनिवारी ४०५ अर्जांची विक्री होऊन ४ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण ५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यात प्रत्येकी २ अर्ज इंदापूर व खेड तालुक्यामधून आले आहेत तर एक अर्ज हवेलीतून आला आहे. यात ४ पुरुष तर एक महिला आहे. 

तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी आतापर्यंत १ हजार २६५ अर्जांची विक्री झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ७७२ अर्जांची विक्री होऊन एक अर्ज दाखल झाला होता तर शनिवारी ४९३ अर्जांची विक्री झाली व ३ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण ४ अर्ज दाखल झाले आहेत. यात ३ अर्ज खेड तर एक अर्ज हवेलीतून आला आहे. यात चारही अर्ज पुरुषांचे आहेत. गणांसाठीच्या अर्ज विक्रीत सर्वाधिक १९४ अर्ज तर गटांसाठीही सर्वाधिक १३० अर्ज एकट्या दौंड तालुक्यातून विक्री झाले आहेत.

Web Title : जिला परिषद चुनाव: पुणे में कम आवेदन, पर कई फॉर्म बिके।

Web Summary : पुणे में जिला परिषद चुनावों में सीमित आवेदन, लेकिन फॉर्मों की बिक्री अधिक। पांच जिला परिषद, चार पंचायत समिति आवेदन दाखिल। अंतिम तिथि: 21 जनवरी।

Web Title : Zilla Parishad Election: Few applications filed, many forms sold in Pune.

Web Summary : Zilla Parishad elections see limited applications but high form sales in Pune. Five ZP, four Panchayat Samiti applications filed. Deadline: January 21.