ZP Election 2026: तासभर उभी चढण, लोखंडी शिडी..! पुण्यातील सर्वात उंच रायरेश्वर मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची थरारक चढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 11:55 IST2026-02-07T11:52:01+5:302026-02-07T11:55:57+5:30

- एक तास उभी चढण, वळणावळणाची वाट आणि लोखंडी शिडीच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र गाठले.

Zilla Parishad Election: Hour-long vertical climb, iron ladder..! Thrilling climb of employees at the highest Raireshwar polling station in Pune | ZP Election 2026: तासभर उभी चढण, लोखंडी शिडी..! पुण्यातील सर्वात उंच रायरेश्वर मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची थरारक चढाई

ZP Election 2026: तासभर उभी चढण, लोखंडी शिडी..! पुण्यातील सर्वात उंच रायरेश्वर मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची थरारक चढाई

भोर -पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्याच्या पठारावरील मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना कठीण पायी प्रवास करावा लागला. वाहनाने पायथ्यापर्यंत सुमारे ४० किलोमीटर प्रवास केल्यानंतर पुढील एक तास उभी चढण, वळणावळणाची वाट आणि लोखंडी शिडीच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र गाठले.


आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून, प्रत्येक पात्र मतदाराला लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी होता यावे यासाठी प्रशासनाने दुर्गम भागातही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.



भोर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे मतदान साहित्याचे वितरण सकाळी १० वाजता सुरू झाले. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत सूचना देण्यात आल्या. रायरेश्वर मतदान केंद्र दुर्गम असल्याने भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या विशेष बॅकपॅकचे वितरण डॉ. खरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मतदान पथकाने आवश्यक साहित्य घेऊन कठीण मार्गक्रमण करत केंद्रावर यशस्वीरित्या पोहोचले.

या मतदान केंद्राची स्थापना १६० मतदारांसाठी करण्यात आली आहे. दमछाक करणाऱ्या चढाईनंतरही लोकशाही प्रक्रियेत आपले योगदान देताना कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह दिसून येत होता. डॉ. विकास खरात म्हणाले की, देशातील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत मतदानाची सुविधा पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. राज्यातील अनेक दुर्गम भागांत मतदान कर्मचारी विविध आव्हाने पेलत नागरिकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी करून घेत आहेत.

Web Title : दुर्गम मतदान केंद्र: रायगढ़ किले तक चुनाव कर्मचारियों का सफर।

Web Summary : जिला परिषद चुनावों के लिए रायगढ़ किले पर एक दूरस्थ मतदान केंद्र तक पहुंचने के लिए चुनाव कर्मचारियों ने कठिन यात्रा की। दुर्गम इलाके, खड़ी चढ़ाई और लोहे की सीढ़ियों के बावजूद, उन्होंने सभी योग्य मतदाताओं के लिए मतदान सुनिश्चित किया, जो लोकतांत्रिक भागीदारी के प्रति प्रतिबद्धता दर्शाता है।

Web Title : Remote polling station: Election staff trek to Raigad fort.

Web Summary : Election staff overcame a challenging trek to reach a remote polling station at Raigad fort for Zilla Parishad elections. Despite difficult terrain, including steep climbs and iron ladders, they ensured voting access for all eligible voters, demonstrating commitment to democratic participation.