वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील ५ गट व १० गणांसाठी १०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. छाननीनंतर २ अर्ज अवैध ठरवण्यात आले असून आता जिल्हा परिषदेसाठी २७ तर पंचायत समितीसाठी ५० उमेदवारी अर्ज वैध झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली.
पंचायत समितीच्या काले गणातील उद्धवसेनेच्या शहनाज संतोष कुंभार यांचे मतदार यादीत नाव नसल्याने तसेच वराळे गणातील काँग्रेसचे शिंदे अनंता बबन यांच्या उमेदवारी अर्जात सूचकाची स्वाक्षरी नसल्याने हे दोन्ही अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले.
८ हरकती घेतलेले उमेदवारी अर्ज
छाननी प्रक्रियेत हरकत घेतलेल्या इंदुरी गटातील भाजपच्या उमेदवार मेघा प्रशांत भागवत यांचे शपथ पत्र अभिसाक्ष नसल्याची हरकत घेतली होती. कुसगाव बुद्रुक गटातील भाजपचे उमेदवार दत्तात्रय शंकर गुंड यांच्या अर्जावर निरंक केल्याने हरकत घेतली होती. सोमाटणे गणातील भाजपचे उमेदवार बाळासाहेब नथु पारखी यांनी गुन्ह्याची माहिती सादर न केल्याची हरकत होती. तसेच सुभाष धामणकर यांच्या अर्जावरही हरकत होती, काले गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवार शैला रामचंद्र कालेकर त्यांच्यावर घर दाखवलं पण व्हॅल्युएशन न दाखवल्यामुळे हरकत घेतली होती.
कार्ला गणातील उद्धवसेनेच्या उमेदवार अश्विनी अमोल भेगडे किरकोळ हरकत घेतली होती. नाणे गणातील भाजपच्या उमेदवार संगीता ज्ञानेश्वर आढारी यांच्या अर्जावर किरकोळ हरकत घेतली होती. चांदखेड गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता मनोज येवले यांच्या उमेदवारी अर्जांवर प्रॉपर्टी लपवली, याबाबत हरकत घेण्यात आली होती.
सर्व हरकती फेटाळल्या
हरकत घेतलेले ८ ही उमेदवारी अर्ज सुनावणीनंतर सर्व हरकती फेटाळण्यात आल्या असून आदेशाद्वारे सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी जाहीर केले.
Web Summary : 27 Zilla Parishad and 50 Panchayat Samiti nominations are valid after scrutiny in Maval. Two nominations were rejected due to voter list issues and missing signatures. Objections against eight nominations were dismissed after a hearing; all are now valid.
Web Summary : मावल में जांच के बाद 27 जिला परिषद और 50 पंचायत समिति नामांकन वैध हैं। मतदाता सूची के मुद्दे और हस्ताक्षर गायब होने के कारण दो नामांकन रद्द कर दिए गए। आठ नामांकनों के खिलाफ आपत्तियां सुनवाई के बाद खारिज कर दी गईं; सभी अब वैध हैं।