जिल्हा परिषदेचा आज अर्थसंकल्प; नव्या योजना-प्रकल्पांकडे सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:33 IST2026-03-17T12:33:03+5:302026-03-17T12:33:19+5:30

१८ मार्च रोजी पुणे जिल्हा परिषदेचे नव्याने गठन होणार असून, अध्यक्षपदाची निवडही होणार आहे.

Zilla Parishad budget today; Everyone's attention on new schemes and projects | जिल्हा परिषदेचा आज अर्थसंकल्प; नव्या योजना-प्रकल्पांकडे सर्वांचे लक्ष

जिल्हा परिषदेचा आज अर्थसंकल्प; नव्या योजना-प्रकल्पांकडे सर्वांचे लक्ष

पुणे :पुणेजिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे मंगळवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता सादर करणार आहेत. गेल्यावर्षी २९२ कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाचा आकार किती असेल तसेच त्यामध्ये कोणत्या नव्या योजना व विकास प्रकल्पांना प्राधान्य दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील आर्थिक वर्षात मूळ अंदाजपत्रक २३४ कोटी रुपयांचे होते. नंतर विविध निधींच्या वाढीमुळे ते अंतिमतः सुमारे ४१० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे यंदाच्या २९२ कोटी रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाचा अंतिम आकार किती वाढणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, १८ मार्च रोजी पुणे जिल्हा परिषदेचे नव्याने गठन होणार असून, अध्यक्षपदाची निवडही होणार आहे. त्यामुळे प्रशासकांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी नव्या पदाधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. तरीही प्रशासकांच्या कार्यकाळात तयार झालेल्या या अर्थसंकल्पावर त्यांचा प्रभाव राहणार असल्याचे मानले जात आहे.

Web Title : पुणे जिला परिषद का बजट आज: नई योजनाओं, परियोजनाओं पर ध्यान

Web Summary : पुणे जिला परिषद का 2026-27 का बजट आज पेश होगा, जिसमें नई योजनाओं पर ध्यान केंद्रित किया जाएगा। पिछले साल का ₹292 करोड़ का बजट बढ़ने की उम्मीद है। जल्द ही एक नई परिषद के गठन के साथ, बजट का कार्यान्वयन नए अधिकारियों के साथ है, जो प्रशासक के प्रभाव को दर्शाता है।

Web Title : Pune Zilla Parishad Budget Today: Focus on New Schemes, Projects

Web Summary : Pune Zilla Parishad's budget for 2026-27, presented today, eyes new schemes. Last year's ₹292 crore budget is anticipated to grow. With a new council forming soon, the budget's implementation rests with new officials, reflecting administrator influence.