Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प १७ मार्चला; प्रशासकांकडून सादर व मंजुरीची प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:35 IST2026-03-14T13:34:12+5:302026-03-14T13:35:19+5:30

- शासनाच्या निर्देशानुसार २७ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करणे बंधनकारक असल्याने प्रशासकांकडूनच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Zilla Parishad budget on March 17; Process of submission and approval by administrators | Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प १७ मार्चला; प्रशासकांकडून सादर व मंजुरीची प्रक्रिया

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प १७ मार्चला; प्रशासकांकडून सादर व मंजुरीची प्रक्रिया

पुणे : जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सादर करण्यात येणार असून तो प्रशासक गजानन पाटील मांडणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार २७ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करणे बंधनकारक असल्याने प्रशासकांकडूनच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड १८ मार्च रोजी होत आहे. मात्र अध्यक्ष निवडीनंतर सर्वसाधारण सभा बोलावण्यासाठी आवश्यक असलेला किमान १२ दिवसांचा कालावधी उपलब्ध होत नसल्याने अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी प्रशासकांवर आली आहे.

अर्थसंकल्प सादर करून त्याच्या मंजुरीसाठीचे सूचना पत्र गुरुवारी काढण्यात आले. अध्यक्ष निवडीनंतर त्यांच्या अधिकारात सर्वसाधारण सभा बोलावली जाईल. त्या सभेत हा अर्थसंकल्प अवलोकनार्थ सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद सभा नियमावलीनुसार तातडीची सभा बोलवण्यासाठी किमान १२ दिवसांचा कालावधी आवश्यक असतो, तर नियमित सभेसाठी १७ दिवस आधी सूचना पत्र देणे बंधनकारक आहे. अध्यक्ष निवड १८ मार्चला होत असताना आणि २७ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करणे आवश्यक असल्याने अवघ्या नऊ दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गजानन पाटील हेच सन २०२५-२६ चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक आणि सन २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक मांडून मंजूर करणार आहेत.

Web Title : पुणे जिला परिषद बजट: प्रशासक 17 मार्च तक पेश और मंजूरी देंगे

Web Summary : पुणे जिला परिषद का 2026-27 का बजट प्रशासक गजानन पाटिल द्वारा 17 मार्च तक पेश और अनुमोदित किया जाएगा, अध्यक्ष के चुनाव से पहले समय की कमी के कारण।

Web Title : Pune Zilla Parishad Budget: Administrator to Present and Approve by March 17

Web Summary : Pune Zilla Parishad's budget for 2026-27 will be presented and approved by the administrator, Gajanand Patil, by March 17, due to time constraints before the president's election.