Pune Crime: पानशेत येथे युवकाचा दगडाने ठेचून खून; ५ जणांना १२ तासांत अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:31 IST2025-06-18T15:30:53+5:302025-06-18T15:31:49+5:30
गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेऊन मंगळवारी हल्लेखोरांना 12 तासात अटक केली

Pune Crime: पानशेत येथे युवकाचा दगडाने ठेचून खून; ५ जणांना १२ तासांत अटक
वेल्हे: पानशेत (ता. राजगड) येथे लाथा बुक्या व दगडाने ठेचून कातकरी समाजातील युवक रोहिदास काळुराम काटकर (वय २४, रा. कादवे, ता. राजगड) याचा खुन करणाऱ्या पाच हल्लेखोरांना 12 तासांत अटक करण्यात वेल्हे पोलिसांना यश आले आहे. याबाबत ग्रामस्थांकडून वेल्हे पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
आकाश सुभाष भिसे ( वय २१), भागवत मुंजाजी आसोरे ( वय २०), रितेश उत्तम जोगदंड (वय २१, सर्व रा. नन्हे), उमेश उर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय २१, रा. पेडगाव, परभणी), पांडुरंग भानुदास सोनवणे (वय १८, रा. नन्हे) अशी अटक केल्यांची नावे आहेत. न्यायालयाने पाचही हल्लेखोरांना २२ जुन पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
रविवारी (दि.१५) रात्री पानशेत येथे दुचाकीवरुन आलेल्या आकाश रोहिदास काटकर भिसे व त्याच्या साथीदारांनी रोहिदास काटकर व त्याचा मित्र विजय पांडुरंग जाधव यांच्यावर हल्ला केला. रोहिदास याला बेदम मारहाण करत हल्लेखोरांनी दगडाने हल्ल्यात विजय जखमी झाला. या प्रकरणी अविनाश काटकर याच्या फिर्यादीनुसार वेल्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगंळ, उपनिरीक्षक अमित देशमुख, अंमलदार आकाश पाटील, ज्ञानदीप धिवार, युवराज सोमवंशी आदींसह गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेऊन मंगळवारी हल्लेखोरांना 12 तासात अटक करण्यात आली.याबाबत राहुल ठाकर, अमोल जागडे,विनोद बिरामणे,गणेश ठाकर ,मोहिल तेलवडे यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.