Pune News : मंचर शहरात तरुणाचा दगडाने ठेचून खून; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 14:50 IST2022-10-22T14:48:33+5:302022-10-22T14:50:01+5:30
पोलिसांनी ४८ तासांत खुनाचा उलगडा करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत....

Pune News : मंचर शहरात तरुणाचा दगडाने ठेचून खून; गुन्हा दाखल
मंचर (पुणे) : अज्ञात कारणावरून तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. ही घटना मंचर शहरात घडली आहे. गौरव शिवाजी राजगुरू (वय २९, रा. मोरडेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अरिफ अजिज कुरेशी (रा. मंचर) व संत्या उर्फ संतोष नारायण सकत (रा. धामणखेल) यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी ४८ तासांत खुनाचा उलगडा करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी सव्वापाच ते रात्री बाराच्या दरम्यान खुनाची ही घटना घडली आहे. मंचर येथील लक्ष्मीरोडचे एमजी मार्केटजवळ न्यू हाय कपड्यांच्या दुकानाजवळ गल्लीत गौरव शिवाजी राजगुरू (वय २९, रा. मोरडेवाडी) याला कोणत्यातरी कारण्यावरून मनात राग धरून अरीफ अजीज कुरेशी याने लाथाबुक्याने मारहाण केली, तर संत्या उर्फ संतोष नारायण सकत याने हातात दगड घेऊन त्या दगडाने गौरव राजगुरू यांच्या डोक्यात, माथ्यावरती, कपाळावर, डाव्या डोळ्याजवळ, डाव्या गालावर दगडाने तसेच लाथाबुक्याने अमानुषपणे मारहाण करून त्याचा खून केला आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार तानाजी सखाराम हगवणे यांनी मंचर पोलिसांत फिर्याद दिली. दोघं आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.