शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

तरुणाईने सुरु केला "अन्नदान यज्ञ"! कोरोनाच्या लढाईत गरजुंना मायेचा घास....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 6:36 PM

शहरातील विविध भागात रस्त्यावरच्या निराधार, बेघर लोकांना, कुटुंबांना देता फूड पँकेट

ठळक मुद्देयुवापिढीसमोरल एक नवा आदर्श, दैनंदिन जवळपास ६०० ते ७०० फूड पँकेट देण्याची तयारी

पुणे: कोरोना काळात तरूणाई स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून स्वखर्चाने आणि स्वत:च्या हाताने जेवण तयार करून गरजुंना मायेचा घास भरवत आहे. या तरूणांनी हा ‘अन्नदान यज्ञ’ सुरू करून युवापिढीसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कोरोना ही एकट्या-दुकट्याची नव्हे तर सर्वांनी मिळून लढण्याची लढाई आहे. या तरूणांमध्ये कुणी डॉक्टर, वकील, तर आयटी इंजिनिअर आहेत. इतरांप्रमाणेच त्यांना देखील जीवाची भीती आहेच. पण त्याची पर्वा न करता समाजभान आणि संवेदनशीलतेतून त्यांनी हा ‘अन्नदान यज्ञ’ सुरू केला आहे. 

याविषयी अँड अभिषेक जगताप यांनी ‘लोकमत’ला सांगितलं की, आम्ही सोसायटीतील वीस तरूण-तरूणींनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला आहे. सोसायटीमध्ये एक छोटासा हॉल आहे, तिथे आमच्यामधील सहा ते सात जण मिळून जेवण तयार करतात. त्यासाठी सकाळपासूनच तयारी सुरू होते. आम्ही सकाळी लवकर जाऊन मार्केटयार्ड येथून भाजीपाला आणतो, त्यानंतर भाजी निवडण्यापासून ते प्रत्यक्ष स्वयंपाकाला सुरूवात केली जाते. एका बॉक्समध्ये हे जेवण पँक केले जाते. आमच्यातलेच काही स्वयंसेवक स्वत: दुचाकीवर जाऊन शनिवारवाडा, कोथरूड, कँप आदी शहरातील विविध भागातील रस्त्यावरच्या निराधार, बेघर लोकांना, कुटुंबांना पँकेट देण्याचे काम करतात. दैनंदिन जवळपास ६०० ते ७०० फूड पँकेट तयार केली जातात.

सुरूवातीला आम्ही सर्वांनी पैसे गोळा केले आणि या उपक्रमाचा कामाचा श्रीगणेशा केला. आता अनेक मंडळी आम्हाला आपणहून पैसे देतात. पण आम्ही ते पैसे घेत नाही. उलट आम्हाला धान्य किंवा भाजीपाला आणून द्या आणि आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा असे सांगतो. याशिवाय आम्ही रस्त्यावर सोडलेल्या भाकड गाई, भटकी कुत्री, लहान पिल्लांना देखील खायला घालण्याचे काम करतो. हा उपक्रम हळू हळू वाढविण्याचा आमचा विचार आहे. या उपक्रमाला पोलिसांचे देखील सहकार्य मिळत आहे.

सर्व हॉटेल्स, दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यावरच्या कुटुंबांना, मुलांना खायला काही मिळत नव्हते. किराणा मालाचे सामान दिले तर ते बनविणार कुठे? असा विचार मनात आला. मग आम्हीच जेवणाचे डबे तयार करून त्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. असे वकील अभिषेक जगताप यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसSocialसामाजिक