Pune Crime: वैमनस्यातून तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून; ४ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 18:37 IST2026-04-13T18:35:40+5:302026-04-13T18:37:49+5:30

पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले

Youth stabbed to death with sharp weapon due to enmity; 4 arrested | Pune Crime: वैमनस्यातून तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून; ४ जण अटकेत

Pune Crime: वैमनस्यातून तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून; ४ जण अटकेत

पुणे : वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील काशेवाडी भागात घडली. या प्रकरणी खडक पोलिसांनी चौघांना अटक केली. अबूबकर अमजद खान (वय १८, रा. एडी कॅम्प चौक, नाना पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी अम्मार शेख (वय १९, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ), कमरअली सय्यद (वय १८, रा. विमाननगर), तुफेल सय्यद (वय १९) आणि अबूझर कुरेशी (वय १८, रा. काशीवाडी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली. याबाबत अल्तमश अन्सार पिंजारी (वय १९, रा. मोमीनपुरा, घोरपडे पेठ) याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबूबकर आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. अबूबकर आणि त्याचे मित्र शनिवारी (दि. ११) रात्री सव्वादहाच्या सुमारास काशीवाडी भागातील त्रिकोणी उद्यानाजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. आरोपींनी अबूबकर आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना मारहाण केली. आरोपींनी अबूबकरवर शस्त्राने वार केले. अबूबकरला भोसकल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, उपायुक्त विवेक मासाळ, एसीपी अनुजा देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या अबूबकरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शर्मिला सुतार पुढील तपास करीत आहेत.

Web Title : पुणे: दुश्मनी में युवक की हत्या; मामले में चार गिरफ्तार

Web Summary : पुणे के भवानी पेठ में पुरानी दुश्मनी के चलते एक 18 वर्षीय युवक की चाकू मारकर हत्या कर दी गई। पुलिस ने शिकायत के बाद अम्मार शेख सहित चार संदिग्धों को गिरफ्तार किया। पीड़ित, अबुबकर खान की इलाज के दौरान मौत हो गई। पुलिस जांच जारी है।

Web Title : Pune: Youth Murdered Over Rivalry; Four Arrested in Case

Web Summary : An 18-year-old was fatally stabbed in Pune's Bhavani Peth due to prior animosity. Police arrested four suspects, including Ammar Sheikh and others, following a complaint. The victim, Abubakar Khan, died during treatment. Police investigation is ongoing.